NCP MLA Rohit pawar aggressive over pune kothrud beat young womenpolice
Rohit Pawar On Pune Police : पुणे : पुण्यातील पोलिसांबाबत धक्कादायक आरोप समोर आला आहे. तीन मुलींच्या घरी जाऊन देखील त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचा आरोप केला जात आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात पोलिसांनी तीन दलित तरुणींना पाच तास रिमांड रूममध्ये ठेवून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संपाताची लाट उसळली आहे. यावर पोलिसांनी एफआयआर देखील दाखल न केल्यामुळे वाद चिघळला आहे. सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून मानल्या जाणाऱ्या पुण्यात घडला आहे. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पोलिसांनी तक्रार दाखल का करुन घेतली नाही आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने पुणे पोलीसांनी नकार दिल्यामुळे आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघडीचे नेते सुजात आंबेडकर आणि हजारो कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत आता आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर देखील प्रतिक्रिया देत पुणे पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “कोथरूड पोलिसांनी तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ केली, यासंदर्भात प्रचंड रोष असताना पोलिसांनी FIR नोंदवला नाही, त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. १. एवढा प्रचंड रोष असतानाही पोलिसांनी FIR का नोंदवला नाही? पोलिसांवर कुणाचा दबाव होता? २. छत्रपती संभाजीनगर येथील ओबीसी समाजातील ती पिडीत युवती कोण? ३. या प्रकरणाशी संबंधित माजी पोलीस अधिकारी कोण? त्यांचा पोलिसांवर दबाव होता का? या माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याने पोलिसांना फोन केले? ४. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोथरूड पोलिसांकडे कायदेशीर पत्रव्यवहार किंवा परवानगी घेतली होती का? ५. कोथरूडला तीन युवतींची चौकशी करण्यात आली, एकीला कामाच्या ठिकाणावरून पोलिसांनी नेले, यासाठी पोलिसांकडे तसा सर्च वारंट होता का? ६. चौकशी दरम्यान महिला पोलिसांसोबतच संबंधित माजी पोलीस अधिकारी आणि पोलिस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्ती युवतींच्या कोथरूड येथील घरी चौकशीसाठी का गेल्या होत्या? पोलीस नसलेल्या या व्यक्ती कोण आहेत? या व्यक्ती पोलीस दलातील कुणाशी संबंधित आहेत? कुणाशी त्यांची मैत्री आहे? त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?७. या तीन युवतीना जीवे मारण्याची धमकी कुणी आणि का दिली?” असे प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.
कोथरूड पोलिसांनी तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ केली, यासंदर्भात प्रचंड रोष असताना पोलिसांनी FIR नोंदवला नाही, त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. १. एवढा प्रचंड रोष असतानाही पोलिसांनी FIR का नोंदवला नाही? पोलिसांवर कुणाचा दबाव होता?
२. छत्रपती संभाजीनगर येथील ओबीसी समाजातील… — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 4, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “एकूणच या प्रकरणात पोलीस प्रशासनाने हे प्रकरण ज्याप्रकारे हाताळले त्यावरून पोलिसांवर असलेला राजकीय दबाव स्पष्ट दिसत असून पोलीस यंत्रणा केवळ राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत, असा समज पसरत आहे. परिणामी पोलीस यंत्रणेविषयीच जनतेत अविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांना या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील,” अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे.