Rohit Pawar's attack on Gulabrao Patil's teachers' rebellion
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वी मोठे बंडखोरीचे राजकारण झाले. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी 42 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पड़त राज्याच्या राजकारणाला नवीन दिशा दिली. अजित पवार यांनी याच पावलावर पाऊल ठेवत महायुतीमध्ये सामील झाली. यामध्ये आता शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी याच प्रकारची बंडखोरी ही शिक्षकांनी देखील करावी असा अजब सल्ला दिला. यावरुन आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.
गुलाबराव पाटील यांनी राज्यातील शिक्षकांना शाळा सुरु ठेवण्यासाठी अजब सल्ला दिला. विद्यार्थ्यांच्या कमी पटसंख्येमुळे जळगावाच्या शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. याबाबत शिक्षकांनी नुसते हातावर हात धरुन बसू नये. आम्ही राजकारणी जसे पक्ष फोडतो तसे तुम्हीही या दुसऱ्या शाळेतील पक्ष फोडा आणि शाळा चालवा, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. रोहित पवार यांनी आता विद्यार्थ्यांच्या मागे देखील ईडी लावणार का? असा सवाल विचारत टोला लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले रोहित पवार?
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गुलाबराव पाटील यांना उद्देशून सोशल मीडिया पोस्ट केली आहे. गुलाबराव पाटील यांचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला. यामध्ये ते म्हणाले की, “आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री महोदय #ED #CBI #IT च्या चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटतेय..मंत्री महोदय, विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारा. शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील,” असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावचा दौरा केला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. याचबरोबर गुलाबराव पाटील यांनी तहुव्वर राणा याला भारतात आणण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पाकिस्तानने त्यांचा काही संबंध नसल्याचे देखील सांगितले आहे. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, “तहव्वुर राणा हा 26 /11 चा आरोपी असून त्याला आता अटक झालेली आहे. तहव्वुर राणावर लवकरात लवकर कडक शासन व्हावं, अशी जनतेची भावना आहे. पाकिस्तानची भूमिका पहिल्या पासून अशीच राहिलेली आहे. दाऊद इब्राहिम जरी पाकिस्तानमध्ये असला तरी ते कबूल करायला तयार नसतात. पाकिस्तानचा हे आजचं नसून कायम भारताविरुद्ध कारवाया करणे आणि नंतर ना म्हणणे हा पाकिस्तानचा धंदा आहे,” असा घणाघात शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे.