NCP Sharad Pawar group aggressive against inflation Vadgaon Maval News
वडगाव मावळ : राज्यामध्ये अनेक गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. या
वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरूवारी (दि.24) वडगाव मावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ प्रभारी तथा पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, महिला तालुकाध्यक्ष जयश्रीताई पवार, अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्ष आफताब सय्यद,तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते. वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे .सध्या कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षाच्या निचांकी पातळीवर (प्रति बॅरल $६५.४१) आल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये किंमत प्रति बॅरल $63.40 होती. या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहे. रेटिंग एजन्सी नुसार सध्या तेल कंपन्यां पेट्रोलवर प्रतिलिटर रु. 12-15 आणि डिझेलवर प्रति लिटर 6-12नफा कमवत आहेत. तेल कंपन्यांनी गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवून जनतेच्या पैशाची लूट करत आहे. याच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महागाईच्या विरोधात एल्गार आंदोलन करण्यात आले. अशा आशयाचे निवेदन मावळचे नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना देण्यात आले.
पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आगामी पंचवार्षिक मावळमधील १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत बुधवार (दि २३ ) दुपारी १२:३० वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात काढण्यात आली. यामध्ये मावळातील ५३ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असणार आहे. मावळ तालुक्यात एकूण १०३ ग्रामपंचायती असून त्यांच्या सरपंचपदासाठी ५ मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० या कालावधीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींपैकी आदिवासी क्षेत्रातील १० ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी कायमस्वरूपी राखीव असून, त्यांचा या सोडतीमध्ये समावेश नाही. उर्वरित ९३ ग्रामपंचायतीपैकी नऊ ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी, सहा ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी, २५ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) तर ५३ ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी अभिमन्यू गणेश ढोरे इयत्ता चौथीच्या मुलाच्या हस्ते चिठ्ठया टाकून आरक्षित करण्यात आल्या. सर्वसाधारण ५३ ग्रामपंचायतींमधून महिला व पुरुषांसाठी आरक्षण काढण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड देखील झाला आहे.