Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री छगन भुजबळ यांचा राजभवनामध्ये शपथविधी सोहळा पार; म्हणाले, “ज्याचा शेवट गोड ते सर्वच…”

Chhagan Bujbal Ministerial oath-taking ceremony : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनामध्ये त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला असून यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 20, 2025 | 12:38 PM
NCP's Chhagan Bhujbal, Bhujbal takes oath as minister

NCP's Chhagan Bhujbal, Bhujbal takes oath as minister

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : Chhagan Bhujbal Marathi News  :- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यात अखेर मंत्रिपदाची माळ पडली आहे. राज्यामध्ये दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते. मात्र अखेर त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. राजभवनामध्ये छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील राजभवन येथे सकाळी १० वाजता शपथविधी सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजभवनात छगन भुजबळ यांना शपथ दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मंत्री छगन भुजबळ यांनी शपथविधी सोहळा झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. भुजबळ म्हणाले की, ज्याच्या शेवट गोड ते सर्वच गोड आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी त्यांच्या मंत्रिपदाबाबत दिली आहे. त्याचबरोबर माध्यमांकडून भुजबळ यांना खात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याबाबत मंत्री भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खाते देतील ते मान्य असेल, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे छगन भुजबळ म्हणाले की, “मी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद मानतो. त्याचबरोबर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे देखील धन्यवाद मानतो. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो. मंत्रिपदाच्या ज्या जबाबदाऱ्या असतील ते मुख्यमंत्री ठरवतील. 1991 पासून मी शपथ घेतो आहे. मंत्रिपद येत आहे आणि जात आहे. अनेक खाती सांभाळली आहे. यापुढे देखील जे खाते मिळेल ते सांभाळेल. विशेषतः नाशिक आणि इतर जिल्ह्यामध्ये देखील विकासकामे करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे,” अशी भूमिका नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.

#WATCH | Mumbai, Maharashtra | NCP leader Chhagan Bhujbal takes oath as a minister in the Maharashtra government at the Raj Bhavan.

Maharashtra CM Devendra Fadnavis, deputy CMs Eknath Shinde and Ajit Pawar also present. pic.twitter.com/hQ1eqtZrPr

— ANI (@ANI) May 20, 2025

 

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “येवला मतदारसंघामध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी रडत आहेत. याबाबत मी मुख्यमंत्री आणि इतर सर्वांशी बोलणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना काही मदत करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी कोणत्याही खात्याची अपेक्षा केलेली नाही,” असे स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर भुजबळ यांनी त्यांना धन्यवाद सांगा असे हसून म्हणत भुजबळ यांनी टोला लगावला आहे.

Web Title: Ncps chhagan bhujbal takes oath as minister at raj bhavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Chhagan Bhujbal
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

‘चांगले काम करणाऱ्यांच्या शासन कायम पाठिशी, इच्छाशक्ती असेल तर बदल…’; अजित पवार यांचं मोठं विधान
1

‘चांगले काम करणाऱ्यांच्या शासन कायम पाठिशी, इच्छाशक्ती असेल तर बदल…’; अजित पवार यांचं मोठं विधान

Nashik News: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद पेटणार; छगन भुजबळांच्या पालकमंत्रीपदाला सुहास कांदेंचा विरोध
2

Nashik News: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद पेटणार; छगन भुजबळांच्या पालकमंत्रीपदाला सुहास कांदेंचा विरोध

उपमुख्यमंत्र्याच्या पार्टीच्या कार्यकर्त्याने भर गर्दीत म्हणले, ‘I Love You Dada’, अजित पवारांनी दिले असे उत्तर की….Video Viral
3

उपमुख्यमंत्र्याच्या पार्टीच्या कार्यकर्त्याने भर गर्दीत म्हणले, ‘I Love You Dada’, अजित पवारांनी दिले असे उत्तर की….Video Viral

Mumbai : ईडीवर विश्वास नाही मात्र न्यायव्यवस्थेवर आहे – रोहित पवार
4

Mumbai : ईडीवर विश्वास नाही मात्र न्यायव्यवस्थेवर आहे – रोहित पवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.