Bihar मध्ये उडणार राजकीय धुरळा; आरजेडीने अवलंबवले तर M-Y समीकरण; तर NDA ने थेट सवर्णांनाच...
बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा
6 नोव्हेंबरला होणार पहिल्या टप्प्यातील मतदान
14 नोव्हेंबरला जाहीर होणार निकाल
बिहार विधानसभा निवडणुक जाहीर झाली आहे. दोन टप्प्यात बिहारची निवडणूक होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान 6 तारखेला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या दिवशी 121 जागांवर मतदान होणार आहे. एनडीए आणि महागठबंधन यांचे पहिल्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करून झाले आहेत. यामध्ये जातीय समीकरणांचा विचार केला गेला आहे.
एनडीएने 121 पैकी 48 तिकिटे ही सवर्णांना दिली आहेत. तर महागठबंधनने 23 सवर्ण उमेदवार जाहीर केले आहेत. एनडीएने सवर्णांमध्ये सर्वात जास्त राजपुत उमेदवारांवर विश्वास दाखवला आहे. महागठबंधनने पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 8 मुस्लिम उमेदवार जाहीर केले आहेत.
तर दुसरीकडे आरजेडीने M-Y समीकरण अवलंबवले आहे. 51 जागांवर 34 यादव आणि 6 मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. तर एनडीएने 8 यादव उमेदवार मैदानात उतरवले आहेत. कॉँग्रेसने 2 यादव उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत एनडीएने 121 उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या टप्प्यात एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट देण्यात आलेले नाहीत.
महागठबंधनमध्ये बिघाड झाल्याची चर्चा
आरजेडी पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. आरजेडी पक्षाने आपल्या 143 उमेदवारांची घोषणा केली आहे. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आरजेडी हा एकमवे पक्ष आहे जो सर्वाधिक जागा या निवडणुकीत लढवणार आहे. दरम्यान आरजेडीचे तेजस्वी यादव हे वैशाली जिल्ह्यातील राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा सामना भाजपच्या सतीश कुमार यादव यांच्याशी होणार आहे.
Bihar Politics: महागठबंधनमध्ये बिघाड झाल्याची चर्चा अन् इकडे RJD ने थेट…; राघोपूरमध्ये कोण जिंकणार?
कॉँग्रेसने देखील जाहीर केली उमेदवारांची यादी
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. कॉँग्रेसने आपल्या 6 उमेदवारांची घोषणा केली आहे. कॉँग्रेस बिहारमध्ये एकूण 60 जागा लढवत आहे. काही जागा तर अशा आहेत की जिथे कॉँग्रेस विरुद्ध आरजेडी असा मुकाबला पाहायला मिळणार आहे.
‘एनडीए’ला हरवण्याची स्वप्न पाहणारे महागठबंधनच मोडकळीस?
बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. जागावाटप पूर्ण झालेले नाही. मित्रपक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. सर्वात मोठी राजद व कॉँग्रेस यांच्यात वाद सुरू आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधातच अनेक मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत.
Bihar Politics: ‘एनडीए’ला हरवण्याची स्वप्न पाहणारे महागठबंधनच मोडकळीस? पक्ष एकत्र मात्र… ; विषय काय?
एकमेकांच्या विरोधातच उमेदवार उभे केल्याने, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. नक्की कोणासाठी प्रचार करायचा हे कार्यकर्त्यांना समजत नाहीये. यामुळे महागठबंधनमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वैशाली विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे संजीव कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन दिवसांमध्येच राजदचे अभय कुशावाह यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संजीव कुमार यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने आता या जागेवर तोडगा कसा निघणार हे पहावे लागणार आहे.