बिहारमध्ये निवडणुकीआधीच महागठबंधनमध्ये फूट? (फोटो- टीम नवराष्ट्र)
बिहारमध्ये राजकारण तापले
एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी लढत होणार
14 नोव्हेंबरला जाहीर होणार विधानसभेचा निकाल
Bihar Elections: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन टप्प्यात मतदान आणि 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यातच आता बिहारचे राजकारण रंगू लागले आहे. एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी बिहारमध्ये लढत होणार आहे. दरम्यान निवडणूक लढण्याआधी महागठबंधन मोडकळीस आल्याचे चित्र दिसून येत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. जागावाटप पूर्ण झालेले नाही. मित्रपक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. सर्वात मोठी राजद व कॉँग्रेस यांच्यात वाद सुरू आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधातच अनेक मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत.
एकमेकांच्या विरोधातच उमेदवार उभे केल्याने, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. नक्की कोणासाठी प्रचार करायचा हे कार्यकर्त्यांना समजत नाहीये. यामुळे महागठबंधनमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वैशाली विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे संजीव कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन दिवसांमध्येच राजदचे अभय कुशावाह यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संजीव कुमार यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने आता या जागेवर तोडगा कसा निघणार हे पहावे लागणार आहे.
महागठबंधनमध्ये अनेक विषयांववरून वाद सुरू आहेत. जागावाटप हे केवळ एकच मुद्दा आहे. दरम्यान बिहारची निवडणूक जवळ आली आहे. निवडणूक जवळ आली तरी अजून जागावाटप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महागठबंधन असे नाव दिसून येत असले तरी आतून अजूनही मने एकत्रित झाली नसल्याची स्थिती दिसून येत आहे. बिहारची सत्ता कोण मिळवणार हे येणाऱ्या 14 नोव्हेंबरला समजणार आहे.
दिल्ली दरबारी फडणवीसांचे वजन वाढले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दरबारी वजन वाढल्याचे दिसून येत आहे. केंद्रातील भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपमध्ये एक महत्वाचे नेते आहेत. ते सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. बिहार निवडणूक जिकण्यासाठी आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
Devendra Fadnavis: दिल्ली दरबारी फडणवीसांचे वजन वाढले; केंद्राने दिली मोठी जबाबदारी, आता थेट…
भाजपने बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत 40 जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश असणार आहे.