टिपू सुलतान वादावरून संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस टीका केली. याबाबत खासदार राऊतांनी निशाणा साधला. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. ते म्हणाले की, “एकीकडे टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून राजकारण करायचे आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून सट्टेबाजीच्या माध्यमातून हजारो कोटींची माया जमवायची, असा दुटप्पी चेहरा भाजपचा उघड झाला,” अशा शब्दांत राऊतांनी टीका केली आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक
खासदार राऊत म्हणाले की, “कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टिपू सुलतानचा विषय काढला. टिपू सुलतान किती क्रूरकर्मा होता असं सर्व म्हणाले. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानीला हिरो मानलं जातं. मग अशा देशासोबत भारत जर क्रिकेट खेळत असेल तर देवेंद्र फडणवीसांनी त्याचा धिक्कार आणि निषेध केला पाहिजे, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे धडे आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी धिक्कार करायला हवा, पण ते करत नाहीत कारण ते ढोंगी लोक आहेत. यांना क्रिकेटमधून पैसा मिळतो. शेकडो कोटी मिळतात,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हे देखील वाचा : महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांना भक्तांची अलोट गर्दी; उज्जैनच्या महाकाल मंदिरात पारंपरिक पूजा संपन्न
पुढे ते म्हणाले की, “भारत-पाकिस्तान सामना आम्ही पाहतच नाही. हा सामना म्हणजे भाजपचा खेळ आहे. इथे निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान, हिंदू मुसलमान, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती लोकांना शिकवायची, त्यावर मत मिळवायची आणि पाकिस्तानवर बहिष्कार टाकायचा. बांग्लादेशींना हकलायचं हे त्यांचे कार्यक्रम सुरु असतात. पण जेव्हा पैशांचा विषय येतो, बेटींग, सेटींग आणि जुगाराचा विषय येतो, तेव्हा भारत पाकिस्तान सामने खेळायला जय शाहांना परवानगी दिली जाते. जय शाह हे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे सुपूत्र आहेत,” अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली आहे.






