Anjali Damania News
Anjali Damania News: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र निखील गडकरी यांच्या नवीन व्यवसायातील कमाईवरून निशाणा साधला होता. निखिल गडकरी यांनी सियान अग्रो इंडस्ट्रीज अन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. मागील अवघ्या दीड महिन्यामध्ये या निखिल गडकरी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये चौपट वाढ झाली आहे. असा दावा दमानिया यांनी केला होता.
याला काही तास उलटत नाहीत तोच दमानिया यांनी पुन्हा एक ट्विट करत गडकरींना इशारा दिला आहे. “उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोल खोल करायला सुरवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार आहे.” दमानिया यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. आगामी काळात त्यांनी कोणते आरोप उघड केले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान अंजली दमानिया यांनी निखील गडकरी यांच्या सियान अॅग्रो कंपनीचा लेखाजोखा मांडत निखील गडकरींसह नितीन गडकरींनाही धारेवर धरले होते. माझ्या बुद्धीचं मूल्य प्रत्येक महिन्याला २०० कोटी रुपये इतकं आहे”, असं वक्तव्य गडकरी यांनी अलीकडेच केले होते. त्याच वक्तव्याचा दाखला देत दमानिया म्हणाल्या की “गडकरी स्वतःला खूप कमी लेखतायत. त्यांचा मुलगा तर दिवसाला १४४ कोटी रुपये कमावतोय.” यासंदर्भात त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन निखिल नितीन गडकरी यांच्या कंपनीचा लेखाजोखा मांडला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, “नितीन गडकरी म्हणतात की त्यांना पैशांची गरज नाही. कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत, ते म्हणतात की त्यांच्या मेंदूचं मूल्य दर महिन्याला २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरंतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखले आहे. कारण गडकरींचे पुत्र दररोज १४४ कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत. आपल्याला माहिती आहे की त्यांच्या मुलाची नावाची कंपनी आहे. २५ जून रोजी सियान अॅग्रोमध्ये १,८९,३८,१२१ प्रमोटर होलडिंग शेअर्स होते. या शेअरच्या किमतीत आज ७६ रुपपांची वाढ झाली आहे. म्हणजेच एका दिवसात १४३.९२ कोटी रुपये त्यांनी कमावले निखील व सारंग गडकरी दिवसाला इसके पैसे कमावत आहेत, असा टोला अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून लगावला आहे.
71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!