
Parli vaijnath nagarparishad election result 2025 live maharashtra municipal council munde vs sonawane
परळी नगर परिषद निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गट बाजी मारेल, लोकसभेची पुनरावृत्ती होईल असा विश्वास खासदार बजरंग सोनावणे यांनी व्यक्त केला आहे. नगर परिषदेचे निवडणूक ही जनतेने हातामध्ये घेतली असून परळीचा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास बजरंग सोनावणे यांनी व्यक्त केला आहे. तर सोनावणे यांना थेट लढत मुंडे भावा-बहिणींची आहे. पहिल्यांदाच परळी वैजनाथ नगर परिषदेमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे युती करुन लढा देत आहेत. मात्र त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनावणे यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे यंदाची ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक मुंडे बंधू-भगिनींसाठी प्रतिष्ठेची आहे.
हे देखील वाचा : राज्यातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींची आज मतमोजणी
परळी वैजनाथ नगर परिषदेमध्ये एकूण 33 प्रभाग आहेत. यापूर्वी 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भाजपला धोबीपछाड करत दणदणीत विजय मिळवला होता. त्यावेळी एकत्र असलेल्या राष्ट्रवादीने 33 पैकी 27 जागांवर बाजी मारली होती. तर भाजपला केवळ चार जागांवर विजय मिळवण्यास यश मिळाले होते. त्यामुळे बीडमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा दिसून आला होता. आता मात्र चित्र वेगळे आहे. राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत युतीमध्ये दाखल झाला आहे. यामुळे बीडची जनता कोणच्या पाठीशी मतदानाचा कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता…! भाजपवर किशोरी पेडणेकरांचा संताप, पैशांचे वाटप केल्याचा आरोप