Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; मनसे पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी, कारण काय?

मनसे नेते राज ठाकरे यांनी हिंदी भाषिकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर मराठी भाषेचा आग्रह धरला आहे. यामुळे आता त्यांच्या विरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2025 | 11:24 AM
Petition filed in Supreme Court against Raj Thackeray for attacks on Hindi speakers

Petition filed in Supreme Court against Raj Thackeray for attacks on Hindi speakers

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीमध्ये एकही जागा न मिळलेल्या मनसे पक्षावर अनेकांनी जोरदार टीका केली. मात्र गुढीपाडव्याला गाजलेल्या भाषणानंतर राज ठाकरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी तुफान भाषण करुन सत्ताधारी व विरोधी नेत्यांवर आगपाखड केली. यावेळी त्यांनी राज्यातील मराठी भाषेच्या आग्रहावर जोर दिला. त्यांनी बॅंका, कार्यालये आणि आस्थापने येथे मराठी बोलली जात आहे की नाही यांची खात्री करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये मनसैनिक हे आक्रमक भूमिका घेऊ लागले. यानंतर आता राज ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असल्याचे दिसत आहे.

मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी

मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरामध्ये आंदोलन आणि आक्रमक भूमिका घेतली. तसेच अनेक बॅंकांमध्ये जाऊन मराठी बोलण्याचा आग्रह धरला. तसेच मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या हिंदी भाषिकांना मनसे स्टाईल दणका देखील दिला. यामुळे राज ठाकरे यांना अखेर कार्यकर्त्यांना ही प्रकार थांबवण्याचे आदेश द्यावे लागले. मात्र हिंदी भाषिकांना त्रास दिल्यामुळे मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली जात आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मुंबईत राहणारे आणि महाराष्ट्रात नोंदणीकृत राजकीय पक्ष उत्तर भारतीय विकास सेनाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्याविरोधात याचिका देखील दाखल केली आहे.राज ठाकरे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ले करत असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांविरुद्ध कथित द्वेषपूर्ण भाषण, लक्ष्यित हिंसाचार आणि धमक्यांसंबंधी अनेक प्रकरणांमध्ये कारवाईची मागणी करणारी याचिका मनसेविरोधात दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ॲड. श्रीराम परक्कट यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सुनील शुक्ला आणि इतर हिंदी भाषिक लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणाचे अनेक खटले दाखल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासोबतच, मनसेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने द्यावे अशी धक्कादायत मागणी करण्यात आली आहे. यामुळे आता मनसे पक्ष आणि राज ठाकरे याबाबत काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, सुनील शुक्ला यांना गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात त्यांच्या राजकीय ओळखीमुळे आणि उत्तर भारतीय हक्कांच्या वकिलीमुळे अनेक गंभीर धमक्या आणि छळ तसेच शारीरिक धमक्यांचा सामना करावा लागला आहे. या धमक्या आता सार्वजनिक हिंसाचार आणि शारीरिक हल्ल्यांपर्यंत वाढल्या आहेत, असा आरोप याचिकेमार्फत केला जात आहे.

काय म्हणाले सुनील शुक्ला?

याचिका दाखल केल्यानंतर सुनील शुक्ला यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदू्ंना मारायचा आदेश दिला आहे, असं वाटतं. तुम्ही केवळ उत्तर भारतीयांचे नव्हे तर मराठी लोकांचेही विरोधत आहात. म्हणून मी तुमच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल केली आहे. तुम्ही संविधानाचे उल्लंघन करू शकत नाही. हिंदूंना तुम्ही मारू शकत नाही. आम्ही तुमचा विरोध करतो, निंदा करतो आणि सुप्रीम कोर्टातून तुमच्या विरुद्द आदेश आणणारच,” असा आक्रमक पवित्रा सुनील शुक्ला यांनी घेतला आहे. यानंतर आता राज ठाकरे काय प्रत्युत्तर देणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे.

Web Title: Petition filed in supreme court against raj thackeray for attacks on hindi speakers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • MNS
  • Mumbai
  • raj thackeray
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
1

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
2

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन
3

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
4

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.