
Nagpur Politics, Pune Politics, Anil Sole, Sudhakar Kohale,
Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल
सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर होताच अनिल सोलेंच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. सोले यांच्या कार्यकर्त्यां च्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सोले यांनी सांगितले. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजपसमोर अंतर्गत आव्हान उभे राहिले आहे.
दुसरीकडे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरुनही भाजप आणि शिंदे गटात उघड मतभेद निर्माण झाले आहेत. भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली असून शिंदे गटानेही या मतदारसंघासाठी मंगेश चिवटे यांना मैदानात उतरवण्याच्या तयारी सुरू केली आहे. चिवटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
यामुळे महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजप आणि शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरल्यास पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीतील दोन्ही घटक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा
नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपमधील बंडखोरी आणि पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीतील मतभेद या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधाकर कोहळे यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. दुसरीकडे, अनिल सोले यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न होतात का, तसेच पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कसा सुटतो, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी होणार असून मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीत बंडखोरी समोर आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे. “पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांनीच निवडणूक लढवली पाहिजे, ज्यांना उमेदवारी दिली गेली नाही किंवा मिळाली नाही, त्यांनी माघार घेतली पाहिजे, विधानपरिषदेसाठी भाजपने ३ जागांवर उमेदवारी दिली आहे, या तिन्ही जागा आम्ही जिंकू, असा आमचा विश्वास आहे. तसेच, उर्वरित जागेवर आमचे मित्रपक्ष लढतील. तेही जिंकतील असा आमचा विश्वास आबे. पण पक्षाने ज्याला उमेदवारी दिली आहे त्यानेच निवडणूक लढवावी, इतरांनी माघार घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी केलं आहे. तसेच, ज्यांनी उमेदवारी मिळालेली त्यांनी माघार घ्यावी. त्यानतंरही जे बंडखोर करणार असतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, असंही फडणवीस यांनी नमुद केलं.