या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी सुमारे ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. रामनगर रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यासाठी महत्त्वाचा समजला जाणारा हा पूल कामठी भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात येत होता.
गुडधे यांनी ४ जानेवारी २०२५ रोजी वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित राहून ही याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेवरील स्वाक्षऱ्या संबंधित लिपिक आणि नोंदणी अधिकाऱ्यांसमोर केल्या होत्या.
मंदिराच्या बांधकामासाठी ते सर्व धर्माच्या लोकांकडून देणग्या घेतात आणि निवडणुका आल्या की ते फक्त भाजपचा प्रचार करतात. संघाचे हे दुहेरी धोरण लोकांना समजले आहे. संघाची स्थापना होऊन १०० वर्षे झाली…