Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार’; लक्ष्मण हाकेंच्या इशाऱ्यावर प्रसाद लाड यांचा जोरदार पलटवार

लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत पलटवार केला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आणि सुरू असलेल्या चर्चांबाबतही भूमिका स्पष्ट केली.

  • By विवेक
Updated On: Aug 07, 2026 | 08:28 PM
Prasad lad

Prasad lad

Follow Us
Follow Us:
  • लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्यावर प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर
  • ओबीसी आरक्षणासाठीही संघर्ष करण्याची भूमिका व्यक्त
  • मनोज जरांगे यांच्या उपोषणापूर्वी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा
 

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधात केलेल्या आक्रमक वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. हाके यांनी प्रसाद लाड दिसल्यास त्यांच्या कानशिलात लगावणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर त्यावर आता प्रसाद लाड यांनी जोरदार पलटवार केला आहे.

पत्रकारांशी बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “प्रसाद लाड कोण आहे, हे अजून त्यांना माहिती नाही. त्यांनी आधी गुगलवर शोध घ्यावा.” यावेळी त्यांनी “हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार” या हिंदी म्हणीचा उल्लेख करत अशा प्रकारच्या वक्तव्यांकडे आपण गांभीर्याने पाहत नसल्याचे सांगितले. “अशा लोकांना आम्ही भीक घालत नाही. अनेक आले आणि अनेक गेले,” असेही ते म्हणाले.

लाड यांनी पुढे दावा केला की, लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या पूर्वीच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर संघर्षाची वेळ आली तर आपण भावासारखे त्यांच्या पाठीशी उभे राहू, असेच आपण म्हटले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण

हाके यांच्यावर टीका करताना प्रसाद लाड म्हणाले की, गरज पडल्यास त्यांनाही रोजगार देण्याची तयारी आहे. “मी हजारो लोकांना रोजगार देतो. त्यांनी आम्हाला शिकवण्यापेक्षा स्वतः काहीतरी उभं करून दाखवावं,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच आपल्या उद्योगसमूहावर विविध नियामक संस्थांचे सातत्याने नियंत्रण असल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही प्रसाद लाड यांनी भाष्य केले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणापूर्वी सकारात्मक तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगमंत्री उदय सामंत, स्वतः आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने संवाद सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

‘प्रसाद लाड दिसले तर कानशिलात लगावणार’; लक्ष्मण हाके यांचा इशारा, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नवा वाद

सर्वोच्च न्यायालयातील प्रक्रियेच्या अनुषंगाने काही कायदेशीर कागदपत्रांवरही अभ्यास सुरू असल्याचे लाड यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत संबंधित चर्चेसाठी आपण उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यास मोठ्या संख्येने मराठा समाजाचे नागरिक त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी होतात. त्यामुळे उपोषणाची वेळ येऊ नये आणि संवादातून मार्ग काढावा, हा आमचा प्रयत्न असल्याचे प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले.

Web Title: Prasad lad reply to laxman hake warning maratha obc politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Laxman hake
  • Manoj Jarange Patil
  • Prasad Lad

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा
1

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
2

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Manoj Jarange: बीडमध्ये सरकारचे नेते, तर पॅरिसमधून चर्चा! जरांगेंच्या उपोषणाला 20 व्या दिवशी अर्धविराम; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
3

Manoj Jarange: बीडमध्ये सरकारचे नेते, तर पॅरिसमधून चर्चा! जरांगेंच्या उपोषणाला 20 व्या दिवशी अर्धविराम; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य
4

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.