Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायगड पालकमंत्री पदावरून प्रवीण दरेकर यांचे कानपिचक्या,”आमचे तीन आमदार विसरू नका…”

रायगड पालकमंत्री पदावरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या संघर्षात भाजपने हस्तक्षेप करत प्रवीण दरेकर यांनी संयम राखण्याचा सल्ला दिला. महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा भाजप प्रवेश.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 28, 2025 | 09:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षात भाजपने उडी घेतली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला सुनावत, “जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत, हे विसरू नका,” असे सुचक विधान केले. गोरेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर यांनी दोन्ही पक्षांना फटकारले. “महायुतीच्या सर्व आमदारांनी जनतेच्या विश्वासाला शोभेल असे वागले पाहिजे,” असे सांगत दरेकर यांनी पालकमंत्री पदावरून रस्त्यावर सुरू असलेले वाद महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि विशेषतः रायगड जिल्ह्याला शोभणारे नसल्याचे ठणकावले. “पालकमंत्री पद म्हणजे जीवन-मरणाचा प्रश्न नाही. या वादाचे व्हिडीओ बाहेर येणे लज्जास्पद आहे,” असे ते म्हणाले.

नाराज शिवसैनिकांच्या मनधरणीकरिता अंबादास दानवेंची मध्यस्थी, बैठकीनंतरही शिवसैनिकांचा निर्णय पक्का

महाविकास आघाडीला राज्यातील जनतेने नाकारून महायुतीला मोठा जनाधार दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “महायुतीतील पक्षांनी संयमाने वागावे. भाजपने संयम राखला आहे, आम्ही पक्ष नेतृत्वाच्या पुढे कधी गेलो नाही. भाजपच्या सहकारी पक्षांनीही संयम पाळून वादविवाद टाळावा व आपापल्या नेतृत्वाकडे भूमिका मांडावी,” असा सल्ला त्यांनी दिला.

पदासाठी सुरू असलेल्या संघर्षावर बोलताना दरेकर म्हणाले, “दोघेही पक्ष असेच भांडत राहिले तर ‘तुला नाही, मला…’ अशी परिस्थिती निर्माण होईल. या जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत हे दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवावे.” दरेकर यांनी भाजपच्या ताकदीबद्दलही भाष्य केले. “मी स्वतः राज्याचा विरोधी पक्षनेता होतो. भाजपचे सर्वाधिक आमदार असूनही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मात्र आम्ही पक्षाच्या निर्णयाचा आदर केला. संयम राखून पुढे जाणे हेच आमचे धोरण आहे,” असे त्यांनी सांगितले.

महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता प्रवीण दरेकर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. “भाजप नेहमीच चांगल्या विचारांच्या आणि सामाजिक कामात पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींना योग्य संधी देतो. स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती अद्याप मला निश्चित नाही. मात्र, त्या भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल आणि आम्ही त्यांचे स्वागत करायला तयार आहोत,” असे दरेकर म्हणाले.

शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकी तर भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर’; ठाकरेंच्या बड्या नेत्यांचा दावा

जगताप यांची महाड परिसरातील राजकारणात विशिष्ट ओळख आहे आणि त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाडसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातून जर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तर स्थानिक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरेकरांच्या या विधानांमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्नेहल जगताप यांचा भाजप प्रवेश महायुतीच्या प्रतिमेला सकारात्मक बळ देईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title: Praveen darekars plea for the post of guardian minister of raigad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • MLA Pravin Darekar
  • Raigad News

संबंधित बातम्या

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
1

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Karjat News : पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर उतरले रस्त्यावर; एक दिवसीय धरणे आंदोलनात 2000 हून नागरिकांच्या सह्या
2

Karjat News : पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर उतरले रस्त्यावर; एक दिवसीय धरणे आंदोलनात 2000 हून नागरिकांच्या सह्या

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?
3

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?

Matheran News : स्थानिकांचा रोजगार बंद करण्याचा डाव; सुशोभीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या पोटावर पाय
4

Matheran News : स्थानिकांचा रोजगार बंद करण्याचा डाव; सुशोभीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या पोटावर पाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.