शिवसेनेच्या बड्या नेत्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षांनी ऑफर दिली असल्याचा दावा केला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. अनेक बड्या नेत्यांचा यंदाच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला असून अनेकांच्या संधी पक्षाने नाकारल्या आहेत. तसेच सत्ताधारी पक्षाकडून ऑफर आल्याचा दावा देखील केला जात आहे. यामध्ये आता ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने भाजपकडून आणि शिंदे गटाकडून ऑफर असल्याचा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील इतर पक्षांकडून ऑफर मिळाल्याचा मोठा दावा केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी त्यांना भाजप व शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूकीपूर्वी ऑफर मिळाली असल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. मात्र त्यापूर्वी महायुतीमधील शिंदे गट व भाजपकडून ऑफर मिळावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैर?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांना शिंदे गटाकडून ऑफर असल्याचे सांगितले. शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी ही खैरे यांना ऑफर दिली असल्याचा दावा देखील त्यांनी केला. चंद्रकांत खैरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय शिरसाट यांनी मला ऑफर दिली होती. शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुक लढवा, आम्ही सर्व खर्च करू अशी ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला. संजय शिरसाठ यांनी शिंदे गटात येण्याची ऑफर दिल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे चंद्रकांत खैरे यांनी भाजपकडून ऑफर असल्याचे देखील सांगितले. माजी खासदार खैरे म्हणाले की, “हरिभाऊ बागडे यांच्याप्रमाणे राज्यपाल करण्याची ऑफर देण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्यपाल पदासाठी आपल्याला दिल्लीतून ऑफर आल्याचा चंद्रकांत खैरे यांनी दावा केला. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपा उद्धव ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत होते,” असा मोठा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए आघाडी अशी चुरशीची लढत झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असे यश मिळाले नाही. भाजपला मोठा धक्का बसला तर इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने पूर्ण बाजी पालटली. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला न भूतो न भविष्यती असे एकतर्फी यश मिळाले. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. उद्धव ठाकरे व शरद पवार गट यांनी अनेक दावे केले होते. मात्र राज्यामध्ये विरोधी पक्षनेते दावा करण्याएवढे बहुमत देखील महाविकास आघाडीच्या कोणत्याच मित्रपक्षाला जमले नाही.