
Ravindra Chavan Solapur Visit
सोलापूर : पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याचा एकदिवसीय दौरा केला. या दौऱ्यात संघटनात्मक बैठका, शिक्षक संघटनांशी संवाद आणि पक्षविस्तारावर भर देण्यात आला. त्यामुळे भाजपच्या गोटात निवडणुकीच्या तयारीला वेग आल्याचं चित्र आहे. (Pune MLC Election)
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी रविंद्र चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
निवडणुकीच्या नियोजनाचा आढावा घेताना प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी, सरकारची लोककल्याणकारी कामं मतदारांपर्यंत पोहोचवावीत आणि दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलं.
या दौऱ्यात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिनिधींशी बैठक झाली. यावेळी शिक्षकांच्या मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी रविंद्र चव्हाण यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप-महायुती सरकार कटिबद्ध असल्याची भूमिका मांडली. दरम्यान, या संघटनेने पत्राद्वारे भाजप-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
मंगळवेढ्यातील कार्यक्रमाला नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, अनिल बोदाडे, प्रमोद सावंजी, नगरसेविका विद्यागौरी अवघडे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
याशिवाय मंत्री जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, राजेश पांडे, आमदार विजय देशमुख, देवेंद्र कोठे, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यासह पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांनी या दौऱ्यात सहभाग घेतला.
निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांमधील समन्वय, मतदारांशी थेट संपर्क आणि प्रभावी प्रचार यांना महत्त्व असल्याचं या दौऱ्यातून अधोरेखित झालं. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही प्रचाराची तयारी मजबूत करण्यावर भर दिला.
रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामासाठी नवी दिशा मिळाल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक ताकद पणाला लावण्याची तयारी सुरू आहे.
आता डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला किती प्रतिसाद मिळतो आणि या संघटनात्मक तयारीचं मतांमध्ये किती रूपांतर होतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Chandrakant Patil : ‘EVM असो वा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला
Ans: पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी, संघटनात्मक बैठक, शिक्षक संघटनांशी संवाद आणि भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी त्यांनी हा दौरा केला.
Ans: पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे हे भाजप-महायुतीचे उमेदवार आहेत.
Ans: महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिनिधींनी पत्राद्वारे भाजप-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.