
Vidyanand Bapat, Pune News, Ganesh Utsav Pune,
पुण्यातील गणेश उत्सवात डीजे साउंड सिस्टिम विरोधात विद्यानंद बापट सातत्याने भूमिका मांडत असून त्यांच्या सोशल मीडियावरील मुलाखतीतील काही मुद्दयांवरून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. पण गणपती उत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेश यांच्याविषयी केलेल्या वक्तव्ये अवमानकारक आणि आक्षेपार्ह आहेत, असा दावा नोटिस द्वारे करण्यात आला आहे. सार्वजनिक उत्सवात वाजवले जाणारे लाऊडस्पीकर, मिरवणुकाांबाबत कायदेशीर पद्धतीने मत मांडण्याचा अधिकाराला विरोध नाही. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, असेही या याचिकेत म्हटलं आहे.
Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, केवळ 69 धावा दूर
गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल-ताशा पथकांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. बापट यांच्या भूमिकेमुळे काही धार्मिक संघटना, डीजे समर्थक आणि ढोलवादक पथकांमधील व्यक्तींमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर हल्ला झाल्याने पुण्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
मूळचे रत्नागिरीचे असलेले विद्यानंद बापट गेल्या आठ वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ परिसरात वास्तव्यास आहेत. विद्यानंद बापट यांचा कोणताही सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक विषयांवर सक्रियपणे भूमिका मांडतांना दिसत आहेत. 37 वर्षीय विद्यानंद बापट बीपीओ क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे बहुतांश काम घरूनच सुरू असते.पुण्यातील पुरोगामी संघटनांच्या विविध उपक्रमांमध्येही ते सहभागी होत असल्याचे सांगितले जाते.
गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात वाजणारे डीजे आणि ढोल-ताशांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा विद्यानंद बापट यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेतही डीजेच्या वापराला विरोध दर्शवला होता. या भूमिकेमुळे गणेश मंडळांचे प्रतिनिधी तसेच काही राजकीय व्यक्तींनी बापट यांच्या भूमिकेला विरोध केल्याचे सांगितले जाते. महापालिकेतील त्या प्रसंगावेळी परिस्थिती चिघळू नये म्हणून सुरक्षारक्षकांनी बापट यांना बंदोबस्तात बाहेर काढले होते.
दरम्यान, ध्वनीप्रदूषणाविरोधातील भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या विद्यानंद बापट यांना आता मारहाण झाली होती. या हल्ल्यामागील नेमके कारण काय आणि हल्लेखोर कोण आहेत, याबाबत पोलिस तपास करत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असतानाच बापट यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.