पुणे मेट्रो सेवा रात्री 2 पर्यंत सुरू राहणार (फोटो- aigemini )
तसेच, अनंत चतुर्दशीनिमित्त २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते २६ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा सुरू राहणार आहे. या कालावधीत सलग ४१ तास मेट्रो सेवा उपलब्ध राहणार असल्याची माहिती पुणे मेट्रोने दिली आहे. त्यानंतर २७ सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा पुन्हा नियमित वेळेनुसार सुरू होईल.
गणपती बाप्पाच्या आगमनाआधी महामेट्रोचे मोठे गिफ्ट; Pune Metro ने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
Pune Ganeshotsav DJ Ban Row: गणपतीत DJ वाजणार की बंद होणार? पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य
मेट्रोला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारता वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. या नियोजनाची गेल्या तीन दिवसांपासून चाचणी सुरू असून, चाचण्या यशस्वी होत असल्याचे महामेट्राकडून सांगण्यात आले.






