
radhakrishna vikhe patil reaction on political party Alliance
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. तसेच पालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी नेत्यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची देखील पुन्हा एकदा एकी होईल अशी अपेक्षा आहे. यावर जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले असून महाराष्ट्रातील घडामोडींवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये मनोमिलन होऊन पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे नाही येणे हे त्याच अंतर्गत विषय आहे. शरद पवार यांना लोकसभेत अपघाताने मिळालेले यश होते. शरद पवार यांचा विधानसभेत दारूण पराभव झाला. त्यामुळे बळ मिळेल असे वाटत नाही,” असा टोला देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. याबाबत ते म्हणाले की, “पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब एकत्र येतील. आता राज – शिंदे एकत्र येतील म्हणतात, एकत्रीकरणाच्या मोहीम राज्यात सुरू आहे, असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका जाहीर केल्यानंतर राजकारणामध्ये भेटीगाठी वाढल्या आहेत. त्याचबरोबर युतीच्या देखील चर्चांना उधाण आले आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, “भाजप तिरंगा रॅलीने उत्साह आहे. त्यामुळे काही तरी दाखवण्यासाठी काँग्रेस काहीतरी करीत आहे. जायकवाडी कालव्याची दुरुस्ती, धरण गाळ काढण्याचा काम करणार आहे. प्रलंबित प्रकल्प लवकरच पूर्ण होतील. निधी कमी पडला तर पुरवणी मध्ये निधी मिळेल. जायकवाडी कालव्याची दुरुस्ती, धरण गाळ काढण्याचा काम करणार. प्रलंबित प्रकल्प लवकरच पूर्ण होतील,” असे आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा आरक्षणासंदर्भात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या द्विपीठासमोर ही सुनावणी झाली आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देताना नवीन खंडपीठाची निर्मिती करण्याचे सांगितले आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SCBC प्रवर्गातंर्गत वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देण्यात आलेल्या याचिकांवर तत्काळ नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत.