Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Tweet On PM Modi:उरलेल्या समर्थकांकडून टाळ्या-थाळ्या वाजवून घ्या; राहुल गांधींची मोदी सरकारवर जहरी टिका

Rahul Gandhi Tweet On PM Modi: मोदी सरकारच्या धोरणामुळे उद्योगपती, छोटे व्यावसायिक, महागाईने त्रस्त गरीब व मध्यमवर्ग तसेच बेरोजगार तरुण निराश आहेत. टाळ्या वाजत नसल्याने पंतप्रधान नाराज झाले.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 21, 2026 | 08:54 AM
Rahul Gandhi Tweet On PM Modi, PM Modi FICCI Speech Job Creation,

Rahul Gandhi Tweet On PM Modi, PM Modi FICCI Speech Job Creation,

Follow Us
Follow Us:
  • करसवलती दिल्यानंतरही उद्योगपतींनी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले नाही
  • मोदी सरकारच्या धोरणामुळे उद्योगपती, छोटे व्यावसायिक, महागाईने त्रस्त
  • तडजोड करणारा पंतप्रधान कधीही या टेबलवर बसू शकत नाही
Rahul Gandhi Tweet On PM Modi: फिक्कीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतीना रोजगारनिर्मिती आणि कामाचा यांच्या वेतनवाढीबाबत सवाल केल्यानंतर काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल यांनी शुक्रवारी ‘एक्स’वर पोस्ट करत मोदींना लक्ष्य केले. करसवलती दिल्यानंतरही उद्योगपतींनी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले नाहीत आणि नोकऱ्याही निर्माण केल्या नाहीत, असे मोदी उद्योगपतींना विचारत आहेत. हा उद्योगपतींवरील आरोप नसून सरकारचा कबुलीजबाब आहे, असा टोला राहुल यांनी लगावला. पंतप्रधानांच्या ‘भूक इतकी आहे की पोट भरतच नाही, ही भूक कोणाची आहे, हे संपूर्ण देशाला माहीत आहे,’ असे म्हणत त्यांनी जंगले, वीज, कोळसा मोजक्या उद्योगपतींच्या हाती सोपवल्याचा आरोप केला.

उरलेल्या समर्थकांकडून टाळ्या-थाळ्या वाजवून घ्या

मोदी सरकारच्या धोरणामुळे उद्योगपती, छोटे व्यावसायिक, महागाईने त्रस्त गरीब व मध्यमवर्ग तसेच बेरोजगार तरुण निराश आहेत. टाळ्या वाजत नसल्याने पंतप्रधान नाराज झाले. मात्र, त्यांच्या धोरणांनी लोकांना टाळ्या वाजवण्यासारखे ठेवलेले नाही, त्यांनी उरलेल्या समर्थकांकडूनव टाळ्या थाळ्या वाजवून घ्याव्यात, असा टोला राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Navarashtra Special: नातवंडे झाली शिक्षक, आजी-आजोबा विद्यार्थी! घराघरांत रंगतोय स्मार्टफोन शिकण्याचा न

एमएसएमईना धोरणांचा फटका

रोजगारनिर्मिती करणारे छोटे व्यापारी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या जीएसटीमुळे अडचणीत आले, अस्र आरोप राहुल गांधी यांनी केला, सरकारच्या धोरणांमुळे मोठ्या कंपन्यामधील स्पचाँही कमकुवत झाल्याचे ते म्हणाले. एकाधिकारामुळे रोजगार निर्माण होत नाहीत.

ट्रम्प-शी-पुतिनच्या टेबलवर भारत का नाही?

अमेरिका, चीन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची त्रियक्षीय बैठक झाल्यानंतर डोनाल्ड ट्रंप, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यांचा फोटो शेअर करत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले, ‘कॉग्रेस सत्तेत असती तर भारताचे पंतप्रधान या टेबलवर असते. तडजोड करणारा पंतप्रधान कधीही या टेबलवर बसू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Rahul Gandhi Chicago Speech: “मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात…; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ

फिक्कीच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीत फिक्कीच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करताना उद्योगपतींना थेट सवाल केला आहे. २०१४ मध्ये कॉर्पोरेट कर दर ३० टक्के होता, तो सरकारने कमी करून २२ टक्के केला; तसेच १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाला आयकरमधून सूट दिली. असे असूनही, कंपन्यांनी पगार आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे का, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. सरकारकडून विविध लाभ मिळूनही उद्योगाच्या अपेक्षा अपूर्ण राहिल्याचे त्यांनी नमूद केले. या दरम्यान त्यांनी, “मला माहित आहे की तुम्ही आता टाळ्या वाजवणार नाही,” अशी टिप्पणीही केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कशावरून टीका केली आहे?

    Ans: फिक्कीच्या (FICCI) कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करसवलती मिळूनही रोजगारनिर्मिती आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत उद्योगपतींना प्रश्न विचारला होता. या विधानावरून राहुल गांधी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत हा सरकारचाच कबुलीजबाब असल्याची टीका केली आहे.

  • Que: एमएसएमई (MSME) आणि रोजगारनिर्मितीबाबत राहुल गांधी यांनी कोणते आरोप केले आहेत?

    Ans: नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या जीएसटीमुळे रोजगार देणारे छोटे व्यापारी आणि MSME क्षेत्र अडचणीत आले असून, मोजक्या उद्योगपतींच्या एकाधिकारशाहीमुळे नवीन रोजगार निर्माण होत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

  • Que: कार्यक्रमातील टाळ्यांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी काय टोला लगावला आहे?

    Ans: सरकारच्या धोरणांमुळे उद्योगपती, मध्यमवर्ग आणि बेरोजगार तरुण निराश असल्याने लोकांकडे टाळ्या वाजवण्यासारखे काहीच उरलेले नाही; त्यामुळे पंतप्रधानांनी उरलेल्या समर्थकांकडूनच टाळ्या-थाळ्या वाजवून घ्याव्यात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

Web Title: Rahul gandhi attacks pm narendra modi over ficci speech remarks job creation wages msme as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 08:54 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.