ज्येष्ठ नागरिक बनताहेत नव्या पिढीचे डिजिटल विद्यार्थी (फोटो- ai gemini)
पूर्वी मोबाईलवर आलेला संदेश वाचण्यासाठी किंवा एखादा ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मुलांवर अथवा नातवंडांवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र, आता स्वतः मोबाईल हाताळता यावा, दैनंदिन कामे घरबसल्या करता यावीत आणि कोणावर अवलंबून राहावे लागू नये, या उद्देशाने ते स्मार्टफोन वापरण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.
पुण्यातील इंटरनॅशनल लॉन्जेव्हिटी सेंटर-इंडियाने २०१७ पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मोबाईल लिटरसी ट्रेनिंग’ उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून महाराष्ट्रातील विविध भागांतील सुमारे एक हजार ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. दोन अर्धदिवसीय सत्रांमध्ये मोबाईलची प्राथमिक माहिती, विविध ॲपचा वापर, ऑनलाइन पेमेंट आणि सायबर फसवणुकीपासून बचाव याविषयी मार्गदर्शन केले जाते.
प्रशिक्षणामध्ये व्हॉट्सॲप, व्हिडिओ कॉल, ई-मेल, सोशल मीडिया, गुगल मॅप, ऑनलाइन खरेदी, वीजबिल भरणे, कॅब बुकिंग आणि डिजिटल पेमेंट यांचा समावेश असतो. त्याचबरोबर ओटीपी, एटीएम पिन, बँक तपशील अनोळखी व्यक्तींना न सांगणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड न करणे अशा सुरक्षिततेच्या गोष्टीही शिकवल्या जातात.
या प्रक्रियेत नातवंडे आणि तरुण पिढीची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. आजी-आजोबांना एकाच वेळी सर्व गोष्टी शिकवण्याऐवजी प्रत्येक कृती पुन्हा पुन्हा करून दाखवणे, त्यांच्याकडून स्वतः सराव करून घेणे आणि चुका झाल्यास संयमाने समजावून सांगणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरतेमुळे ज्येष्ठांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच पिढ्यांमधील संवादालाही नवे माध्यम मिळत आहे.
Ans: ज्येष्ठ नागरिक व्हॉट्सॲपवर संदेश पाठवणे, व्हिडिओ कॉल करणे, फोटो काढणे, ऑनलाइन बँकिंग, यूपीआयद्वारे पैसे पाठवणे आणि रेल्वेचे तिकीट बुक करणे अशा डिजिटल गोष्टी शिकत आहेत.
Ans: घरातील तरुण मंडळी आणि नातवंडे ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन वापरण्याचे प्रशिक्षण देत आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक डिजिटल साक्षर होत असून दैनंदिन कामांसाठी इतरांवरील अवलंबित्व कमी होत आहे.






