Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi PC: माईक बंद कराल, पण विद्यार्थ्यांचा आवाज नाही!; संसदेत बोलू न दिल्याने राहुल गांधींचा आरोप

पेपरफुटीशी संबंधित ‘परीक्षा सुधारणा विधेयक, २०२६’ वरील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधीनी थेट केंदीय गृहमंत्री अमित शाहांवर गंभीर आरोप केले. सत्ताधारी पक्षाच्या खासदार चांगलेच भडकले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थ्याच्या संसद मार्चदरम्यान शेकडो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 29, 2026 | 05:28 PM
Rahul Gandhi, Supreme Court, Veer Savarkar, Congress, Defamation Case, Breaking News,

Rahul Gandhi, Supreme Court, Veer Savarkar, Congress, Defamation Case, Breaking News,

Follow Us
Follow Us:
  • भारतीय जनता पक्षाने आपल्याला बोलू दिले नाही
  • आज सायंकाळी 6 वाजता मी पत्रकार परिषद घेणार
  • विद्यार्थ्याच्या संसद मार्चदरम्यान शेकडो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
 

Rahul Gandhi PC: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचा मुद्दा संसदेत उपस्थित केल्याचा दावा करत, भारतीय जनता पक्षाने आपल्याला बोलू दिले नाही, असा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली.

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “आज संसदेतील माझ्या भाषणादरम्यान मी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित क्रूर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला. मात्र, भाजपने मला बोलू दिले नाही. आज सायंकाळी 6 वाजता मी पत्रकार परिषद घेणार असून, संसदेत मला जे बोलू दिले गेले नाही, ते सर्व देशासमोर मांडणार आहे. माईक बंद करता येईल, पण विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही.” दरम्यान, राहुल गांधी यांच्या या आरोपांवर भारतीय जनता पक्ष किंवा केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Vande Mataram Bill: राज्यसभेत वंदे मातरम विधेयक मंजूर; अपमान केल्यास होणार ३ वर्षांची शिक्षा

लोकसभेत नेमकं काय घडलं?

पेपरफुटीशी संबंधित ‘परीक्षा सुधारणा विधेयक, २०२६’ वरील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधीनी थेट केंदीय गृहमंत्री अमित शाहांवर गंभीर आरोप केले. सत्ताधारी पक्षाच्या खासदार चांगलेच भडकले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थ्याच्या संसद मार्चदरम्यान शेकडो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. अनेक ठिकाणी पॅलेटगन आणि गोळीबाराच्याही घटना उघडकीस आल्या. याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी थेट, “गृहमंत्री अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.” असा गंभीर आरोप केला.

राहुल गांधी म्हणाले की, “गृहमंत्री अमित शाह यांच्यात सभागृहात येऊन बसण्याचे धाडस नाही. मी त्यांना ३० गाड्यांच्या ताफ्यात थरथर कापत बसलेले पाहिले. गृहमंत्री आज इथे का नाहीत? अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.” राहुल गांधीच्या या आरोपांमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी भाजप खासदारांनी राहुल गांधींकडे माफी मागावी, अशी मागणी केली.

Rahul Gandhi In Lok Sabha: अमित शाहांनीच विद्यार्थ्यांवर गोळीबाराचे आदेश दिले 

राहुल गांधी म्हणाले, “मी काही विद्यार्थ्यांशी बोललो मी त्यांना विचारले की विद्यार्थी असण्याचा अर्थ काय असतो. त्या मुलीने एक सुंदर उत्तर दिले. ती म्हणाली, ‘विद्यार्थी म्हणजे अशी व्यक्ती, जिचे मन आणि हृदय खुले असते. विद्यार्थ्यांना माहित असते की त्यांना अजून शिकायचे आहे आणि हे विश्व सतत बदलत असते. त्यामुळे, त्यांचा असा विश्वास असतो की ज्ञानही सतत बदलत असते.” असं उत्तर विद्यार्थ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाबाबत राहुल गांधी म्हणाले, “मी खूप उत्साहित झालो होतो. देशाच्या भविष्याने आपल्या रस्त्यांवर जे दाखवून दिले, त्याने माझा आत्मविश्वास वाढवला. हा राग नव्हता, हिंसा नव्हती, द्वेष नव्हता. ही या देशातील तरुणांची, या देशाच्या भावी पिढीची एक सखोल अभिव्यक्ती होती. भाजपमधील माझ्या मित्रांसहित सर्व राजकीय पक्षांनी या अभिव्यक्तीचा आदर केला पाहिजे.” असही राहुल गांधींनी नमुद केलं.

 

Web Title: Rahul gandhi press conference at 6 pm lok sabha speech stopped bjp student protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
1

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
2

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना
4

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.