Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : मध्य प्रदेशातील राहुल गांधींच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमातील नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार टीका करत ‘पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’, असा टोला लगावला.

  • By विवेक
Updated On: Sep 20, 2026 | 04:33 PM
राहुल गांधींच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींची मिमिक्री केल्याने फडणवीसांनी साधला निशाणा

राहुल गांधींच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींची मिमिक्री केल्याने फडणवीसांनी साधला निशाणा

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींची मिमिक्री केल्याने राजकीय वादाला तोंड.
  • भाजप नेत्यांकडून राहुल गांधींवर टीका; फडणवीसांनीही साधला निशाणा.
  • ‘पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियनचं काम करावं’, फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
 

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशातील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमातील नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कार्यक्रमात एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री केली. यानंतर भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावरून राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.

नागपुरातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर खोचक शब्दांत टीका केली. “मला असं वाटत आहे की, त्यांना आता हेच काम उरलं आहे. त्यांनी आता पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियनचं काम करावं. त्यांनी ते केल्यास त्यांना चांगला रोजगार मिळेल,” असं फडणवीस म्हणाले. याचवेळी फडणवीस यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. “इथे तर त्यांच्या पक्षाला बेरोजगार करून ठेवलं आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

सोलर क्षेत्रात चीनसोबत स्पर्धा करण्याच्या दिशेने काम सुरू

दरम्यान, नागपुरातील कार्यक्रमात फडणवीस यांनी सोलर मॉड्युल निर्मितीच्या कारखान्याचीही माहिती दिली. या कारखान्यात अत्याधुनिक पद्धतीने सोलर मॉड्युल तयार होत असून, सोलर क्षेत्रात चीनसोबत स्पर्धा करण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

2024 मध्ये या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि त्यानंतर कारखान्यात सुमारे 5 हजार कामगार काम करत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. बदलत्या महाराष्ट्रासह विदर्भ आणि नागपूरच्या औद्योगिक इकोसिस्टमचं हे उदाहरण असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

“बुटीबोरीमध्ये अतिरिक्त जागेची मागणी वाढली”

बुटीबोरीमध्ये सध्या अतिरिक्त जागेची मागणी वाढली असल्याचं सांगताना फडणवीसांनी नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याच्या हालचालींची माहिती दिली. महिंद्राला सुमारे एक हजार एकर जागा देण्यात आली असून, पुढील दोन ते तीन महिन्यांत तिथे काम सुरू करण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसंच सावनेरमध्ये सुमारे 5 हजार एकर जागा अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा दावा त्यांनी केला.

मात्र, या सर्व मुद्द्यांमध्ये राहुल गांधींवरील फडणवीसांची टीका चर्चेचा विषय ठरली आहे. मोदींच्या मिमिक्रीवरून सुरू झालेला हा वाद आता महाराष्ट्राच्या राजकारणातही पोहोचला आहे.

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Web Title: Devendra fadnavis on rahul gandhi pm modi mimicry statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
1

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
2

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
3

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम
4

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.