
दोस्त दोस्त ना रहा! फडणवीसांनी शिंदेंभोवतीचा फास आवळला? 'या' नेत्याच्या घरावर 100 पोलिसांनी टाकली धाड
मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये दुरावा वाढल्याचा अंदाज
आमदार संतोष बांगर यांच्या घरावर छापेमारी
शिंदे फडणवीसांशी चर्चा करणार
हिंगोली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 2 तारखेला मतदान होणार असून 3 तारखेला नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली असल्याचे समजते आहे. हिंगोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमधले वैर सर्वश्रुत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर 100 पोलिसांनी छापेमारी केल्याचे समजते आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास ही छापेमारी केली गेली असल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिल्याचे समोर आले आहे.
काही दिवस आधी भाजप आमदाराने संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आले होते. त्यानंतर 100 पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापेमारी केल्याचे समजले आहे. हेमंत पाटील यांनी बहजप आमदारांच्या दबावाखाली कारवाई केल्याचा आरोप केला आहे. या घटनेची गंभीर दखल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या घटनेबाबत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले. क
ळमनुरी आणि हिंगोली शहरात सेनेचा भगवा झेंडा फडकवला जाईल, असे हेमंत पाटील म्हणाले. आमदारांच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते. मात्र विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून कोणताही पत्र किंवा ईमेल आलेला नाही. ही छापेमारी कोणाच्या परवानगीने करण्यात आली? सत्ताधारी पक्षाचे आमदार मुटकुळे यांच्या दबावाखाली ही कारवाई केली का? असा संतप्त सवाल हेमंत पाटील यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे समजते आहे. आम्ही सरकारमध्ये बरोबरीत आहोत.
भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचे प्रत्युत्तर?
संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यासाठी कलंक आहेत, असे भाजप आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले. संतोष बांगर हे पैशांशिवाय राहुच शकत नाही. त्यांचे अनेक बेकायदेशीर धंदे आहेत. सत्ताबदल झाला तेव्हा बांगर यांनी 50 खोके घेतले होते. ही एक सत्य घटना आहे.