Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: तीन माजी आमदारांच्या कुटुंबीयांमुळे…! उद्या ZP इलेक्शनचा धुरळा; ‘या’ तालुक्यात

ZP Election 2026: मागील निवडणुकीत सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले होते, तर एका जागेवर लोकशाही क्रांती आघाडीचा उमेदवार विजयी झाला होता. 

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 06:44 PM
Maharashtra Politics: तीन माजी आमदारांच्या कुटुंबीयांमुळे…! उद्या ZP इलेक्शनचा धुरळा; ‘या’ तालुक्यात
Follow Us
Follow Us:

शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण सात जागा
मागील निवडणुकीत सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
तीन माजी आमदारांच्या कुटुंबीयांमुळे निवडणूक प्रतिष्ठेची

पुणे: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरूर तालुक्यातील राजकीय चित्र यंदा वेगळ्याच वळणावर उभे राहिले आहे. तीन माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्य थेट निवडणूक रिंगणात उतरल्याने ही लढत केवळ पक्षीय न राहता प्रतिष्ठेची ठरली आहे. मतदार पुन्हा प्रस्थापित नेतृत्वावर विश्वास ठेवणार की नवा इतिहास घडवणार?, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालतीताई पाचर्णे भाजपकडून शिरूर ग्रामीण–न्हावरा गटातून मैदानात आहेत. माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र राजेंद्र गावडे भाजपच्या वतीने टाकळी हाजी गटातून लढत देत आहेत. तर, माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार मांडवगण फराटा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत.

शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण सात जागा आहेत. मागील निवडणुकीत सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले होते, तर एका जागेवर लोकशाही क्रांती आघाडीचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र यंदा भाजपने तालुक्यात कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

ZP Election : नेत्यांचे मनोमिलन, कार्यकर्ते संभ्रमात; शिरुर तालुक्यात नेमकं काय घडतंय?

टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे दामू अण्णा घोडे, शिवसेना (उबाठा)चे बाळासाहेब डांगे, शिवसेना (शिंदे)चे सुभाष पोकळे आणि भाजपचे राजेंद्र गावडे अशी चौरंगी लढत होत आहे. या गटात माजी आमदार पोपटराव गावडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिरूर ग्रामीण–न्हावरा गटात मालतीताई पाचर्णे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वृषाली वाळके यांचे आव्हान आहे. दिवंगत बाबूराव पाचर्णे यांच्याविषयीची सहानुभूती मतदारांवर कितपत परिणाम करणार, याची चर्चा रंगली आहे.

चौरंगी लढतींनी चर्चांना उधाण

मांडवगण फराटा गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता पवार, शिवसेना (ठाकरे)चे मच्छिद्र गदादे, भाजपचे सचिन शेलार आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे दादासाहेब फराटे यांच्यात चौरंगी सामना होत आहे. तळेगाव–रांजणगाव सांडस गटात रेखा बांदल (राष्ट्रवादी), सारिका करपे (शिवसेना शिंदे), दीपाली गव्हाणे (भाजप) आणि रेश्मा शिंदे (अपक्ष) यांच्यातील लढतीमुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. शिक्रापूर–सणसवाडी गटात मोनिका हरगुडे (राष्ट्रवादी) आणि सीमा कळमकर (अपक्ष) यांच्यात थेट लढत होत आहे. येथे भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पाबळ–केंदूर गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल शिवले आणि भाजपचे विकास गायकवाड यांच्यात थेट सामना आहे.

Shirur News : शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर भाजप…

दोन्ही पक्षांचा प्रचारात वेग

रांजणगाव गणपती गटात मागील टर्ममधील जिल्हा परिषद सदस्य स्वाती पांचुदकर (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती पाचुंदकर यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे. औद्योगिक वसाहतीचा प्रभाव असलेल्या या गटात दोन्ही पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे.

Web Title: Shirur taluka formar 3 mla family zp and pancyhayat samiti elections 2026 maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Shirur News
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.