Raj Thackeray and Uddhav Thackeray Appeal Marathi people vijayi sabha 2025
मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारकडून प्राथमिक शाळांमध्ये हिंदी सक्ती करण्यासाठी शासन आदेश काढण्यात आला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळांमध्ये हिंदी ही पर्यायी भाषा म्हणून देण्यात आली होती. याविरोधात ठाकरे गट आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर याबाबत दोन्ही शासन आदेश रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंकडून मराठी माणसांना खास आवाहन करण्यात आले आहे.
हिंदी भाषा सक्तीविरोधात आणि मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू हे एकत्रित मोर्चा काढणार होते. मात्र महायुती सरकारने यासंबंधित दोन्हीही शासन आदेश रद्द केले. यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चा रद्द झाला असली तरी सभा घेण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रितपणे विजयी सभा पार पडणार आहे. येत्या 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंची एकत्रित सभा होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ होणार आहे. यापूर्वी आता ठाकरे बंधूंनी मराठी माणसांना आवाहन केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे सभा घेण्याचे ठरवले आहे. याबाबत आवाहन करत त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं ! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…! आपले नम्र राज ठाकरे – उद्धव ठाकरे, असे आवाहन ठाकरे बंधूंनी मराठी बांधवांना केले आहे.
आवाज मराठीचा…! #विजय #मराठी #महाराष्ट्र #MNSAdhikrut pic.twitter.com/TjzV64X0WM
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 1, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील ठाकरे बंधूंच्या या मेळाव्याची माहिती दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “यापूर्वी आम्ही शिवतिर्थावर सभा घेण्याचे ठरवले होते. यासाठी आम्ही पालिकेकडे विनंती अर्ज केला होता. मात्र पालिका हा अर्ज स्वीकारले असे वाटत नाही. यामुळे राज ठाकरे यांनी एनएससीआय डोमममध्ये मेळावा घेण्याचे सुचवले. याप्रमाणे आता आमचा विजयी मेळावा एनएससीआय डोमममध्ये होणार आहे. मनसे आणि शिवसेनेच्या या विजयी मेळाव्यासंदर्भात आमची एक बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये मेळाव्याचे स्वरुप ठरवण्यात आले. त्याप्रमाणे येत्या 5 जुलै रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजण्याच्या सुमारात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मुंबईतील मोठ्या सभागृहामध्ये हा मेळावा आम्ही घेत आहोत,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.