Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस ठाण्यात नवीन पाच पलंग का? वाल्मिक कराडच्या खातीरदारीबाबत रोहित पवारांचा थेट सवाल

बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला सीआयडी ऑफिसमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये आता पोलीस ठाण्यात नवीन पलंग आणले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 02, 2025 | 10:40 AM
Rohit Pawar alleges new bed to Beed Police Station for Valmik Karad, accused in Santosh Deshmukh murder case

Rohit Pawar alleges new bed to Beed Police Station for Valmik Karad, accused in Santosh Deshmukh murder case

Follow Us
Close
Follow Us:

बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये मास्टर माईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर येत होते. आरोपींना अटत होत नसल्यामुळे संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त केला जात होता. सर्व पक्षीय मूक मोर्चा देखील काढण्यात आला. तसेच मस्साजोग गावाच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन देखील केले. या प्रकरणामध्ये आरोपी असलेला 20 दिवस फरार झाल्यानंतर वाल्मिक कराड याने पुण्यातील सीआयडी ऑफिसला सरेंडर केले. यानंतर त्याला बीडला नेण्यात आले असून यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

वाल्मिक कराड हा सध्या केजमधील सीआयडी ऑफिसमध्ये आहे. त्याची मेडिकल चाचणी करण्यात आली असून काही काळ त्याला ऑक्सिजन देखील लावण्यात आला होता. त्याचबरोबर वाल्मिक कराडला 14 दिवसांचा कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर आता बीड पोलीस ठाण्यामध्ये पाच नवीन पलंग मागवण्यात आले असल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भात काल रात्रीपासून जोरदार चर्चा सुरु आहे. यानंतर यावरुन शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी आवाज उठवला असून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन नवीन पलंग मागवल्यावरुन टीका केली आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. सोशल मीडियावरील रोहित पवारांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

#बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.

नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला…

— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 1, 2025

महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यामध्ये जोरदार गाजत असताना देखील पोलिसांच्या हाती आरोपी लागत नव्हते. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका करण्यात आली. घटनेच्या तब्बल 22 दिवसानंतर वाल्मिक कराड हा शरण आला. सध्या त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र पोलिसांना त्यांचा शोध कसा लागला नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला होता असे सांगितले जात आहे. सीआयडीसमोर येण्याआधी तो उज्जैनमध्ये गेला. त्यानंतर तो कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला असे समोर येत आहे. मग तो पुण्यात आला. या तीनही राज्यात स्वतःच्या कारने तो फिरला असे सीआयडीच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर तो काल पुण्यात स्वतःच्या गाडीतून सीआयडी ऑफिसमध्ये गेला आणि शरण आला.

 

 

Web Title: Rohit pawar alleges new bed to beed police station for valmik karad accused in santosh deshmukh murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • MLA Rohit Pawar
  • Santosh Deshmukh Murder
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे
1

इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे

‘वाकड्यात काम करण्यासाठी तुम्हाला कृषीमंत्रिपद दिलेलं नाही’; दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यावरुन रोहित पवारांची टीका
2

‘वाकड्यात काम करण्यासाठी तुम्हाला कृषीमंत्रिपद दिलेलं नाही’; दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यावरुन रोहित पवारांची टीका

वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार: न्यायालयाचं निरीक्षण
3

वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार: न्यायालयाचं निरीक्षण

Bala Bangar News: धनंजय मुंडेंना संपवण्याचा वाल्मिक कराडचा कट…; बाळा बांगर यांचा गौप्यस्फोट
4

Bala Bangar News: धनंजय मुंडेंना संपवण्याचा वाल्मिक कराडचा कट…; बाळा बांगर यांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.