
Rohit Pawar reaction on controversy between Nitesh Rane and Nilesh Rane dispute
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आमदार रोहित पवार यांनी यामधून राणे कुटुंबावर सल्ला देताना टीकास्त्र डागलं. तसेच हा भावकीतील वाद जवळून पाहिला असल्याचे म्हणत अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच आहे, परंतु आम्ही विरोधक असलो तरी राणे साहेबांबद्दल एक सन्मान आहे, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळं राणे कुटुंबात सुरु असलेला वाद योग्य वाटत नाही, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
माणुसकी हारली! समोर सुरक्षा रक्षक कोसळला तरी जे पी नड्डा देत राहिले भाषण, व्हिडिओ आला समोर
पुढे त्यांनी लिहिले आहे की, भावकी-भावकीत वाद लागल्यानंतर काय होतं, वाद लावणाऱ्यांचा हेतू काय असतो? हे आम्ही अगदी जवळून बघितलंय. राणे बंधूनी कुटुंबात, भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा ओळखून तसंच दुसऱ्याचं महत्व कमी करणं ही भाजपची रणनीती समजून त्या जाळ्यात न अडकता आणि वाद न वाढवता त्यावर पडदा टाकाला पाहिजे! असा सल्ला शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी राणे बंधूंना दिला आहे.
राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच आहे, परंतु आम्ही विरोधक असलो तरी राणे साहेबांबद्दल एक सन्मान आहे, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळं राणे कुटुंबात सुरु असलेला वाद योग्य वाटत नाही. भावकी-भावकीत वाद लागल्यानंतर काय होतं, वाद लावणाऱ्यांचा हेतू काय असतो?… pic.twitter.com/8h9R1GcDh9 — Rohit Pawar (@RRPSpeaks) December 1, 2025
निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, कोर्टाच्या निकालानंतर 8 दिवस आयोग झोपला होता का? काँग्रेसचा संतप्त सवाल
नेमका वाद काय?
शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी काल थेट मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी पोहोचले. यावेळी निलेश राणेंना विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली आहे. यामुळे मालवणच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. यावर किंजवडेकर यांनी ही रक्कम बिजनेसची असून घराचे बांधकाम सुरु असल्याने लागत असल्याचे देखील सांगितले आहे. यावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.