Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : रोहित पवारांची ही स्टंटबाजी…! राष्ट्रवादीच्याच आमदाराने साधला जोरदार निशाणा

अजित पवार यांच्या घातपाताच्या घटनांवरुन आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र ही स्टंटबाजी असल्याची टीका आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 27, 2026 | 03:32 PM
Dhananjay Munde Target Rohit Pawar on FIR case in baramati news

Dhananjay Munde Target Rohit Pawar on FIR case in baramati news

Follow Us
Follow Us:

Maharashtra Politics : मुंबई : अजित पवारांच्या अपघातावरुन आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार यांचा अपघात हा घातपात असल्याची शक्यता रोहित पवारांनी (Rohit Pawar) उपस्थित केला आहे. तसेच व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांनी आग्रह धरला आहे. याच मुद्द्यावरुन त्यांनी मुंबई आणि बारामती पोलीस स्टेशन गाठले होते. यावेळी हजारो समर्थक आणि शेकडो वकील हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे. मात्र आता यावर अजित पवार गटातील नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी रोहित पवार यांनी आक्रमक भूमिके घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच जोरदार टीका देखील केली. दादांना अग्नी द्यायच्या आधी तुम्ही विलिनीकरणाची भाषा बोलत होतात ते काय होते? ज्यावेळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, तेव्हा तुम्हाला वाटले नाही का शुभेच्छा देणारे एक साधे ट्विट करावे? असे अनेक प्रश्न माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केले आहेत.

हे देखील वाचा : रोहित पवारांच्या लढ्याला आले बळ! FIR संबंधित राज ठाकरेंनी सुपुर्द केले दोन दाखले

आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, “दादांच्या अकाली निधनानंतर सर्वांनी निर्णय घेतला की, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचे. माझी मध्यंतरी वाचा गेली होती. तशीच गेली असती तर बरे झाले असते, असं म्हणण्याची वेळ माझ्यावर आली आहे. कारण आपल्या मुखातून दादांबद्दल शोक व्यक्त करण्याची वेळ आली नसती. महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुनेत्रा ताई व्यवस्थित सांभाळातील, असा आम्हाला विश्वास आहे. वहिणींना शपथविधीची घाई झाली होती, आम्ही दबाव टाकत होतो असे म्हणणाऱ्यांना माझा सवाल आहे. अजित दादांना अग्नी द्यायच्या आधी तुम्ही विलिनीकरणाची भाषा बोलत होतात ते काय होते? ज्यावेळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हा तुम्हाला वाटले नाही का शुभेच्छा देणारे एक साधे ट्विट करावे? हे राज्यातील मायबाप जनतेला कळत नाही का?” असे प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केले.

हे देखील वाचा : BMC महापौर रितू तावडे यांचे कोट्यवधींचे घड्याळ चर्चेत? ट्रोलिंग होताच दिलं सडेतोड उत्तर

पुढे धनंजय मुंडे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करणार हे आम्ही आधीच जाहीर केले होते. काल एफआयआर घेतला नाही म्हणून स्टंट केला. आज बारामतीला एफआयआरसाठी स्टंट केला. हे सगळे आमच्या न्यूज किलिंगसाठी केले जात आहे. माझ्या सारख्याला हे खूप किळसवाणे वाटते,” अशा शब्दांत आमदार धनंजय मुंडे यांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

Web Title: Httpswwwnavarashtracomtopicdhananjay munde news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Dhnanjay Munde
  • political news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा
2

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा

MPSC Protest : आंदोलनावरून पडळकर भडकले ! ‘रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागणीने डागलं पाहिजे,’ भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद
3

MPSC Protest : आंदोलनावरून पडळकर भडकले ! ‘रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागणीने डागलं पाहिजे,’ भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
4

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.