Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकनाथ शिंदेंमुळेच मी पुन्हा राजकारणात सक्रीय, त्यांनी मला…; निलेश राणेंनी स्पष्टच सांगितलं

राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आज मी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालो आहे, असं निलेश राणे म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 02, 2026 | 12:01 PM
एकनाथ शिंदेंमुळेच मी पुन्हा राजकारणात सक्रीय, त्यांनी मला...; निलेश राणेंनी स्पष्टच सांगितलं

एकनाथ शिंदेंमुळेच मी पुन्हा राजकारणात सक्रीय, त्यांनी मला...; निलेश राणेंनी स्पष्टच सांगितलं

Follow Us
Follow Us:

चिपळूण : राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आज मी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालो आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारीचा शब्द देऊन मालवण-कुडाळ मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी मदत केली. त्यामुळेच मी दहा वर्षानंतर राज्याच्या सभागृहात आमदार म्हणून सक्रिय झालो आहे, अशा भावना शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केल्या.

 

चिपळुणात रविवारी राधाताई लाड सभागृहात हा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी समर्थकांसह आमदार राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार राणे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे आज मी आमदार झालो आहे. त्यांनी मला विधानसभेला संधी दिली. म्हणूनच मी राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झालो आहे, असे राणे यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिवसेना चिपळूण तालुकाप्रमुख, पंचायत समिती सदस्य संदेश आयरे, विनोद झगडे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख रश्मी गोखले, नगरसेवक निहार कोवळे, कपिल शिर्के, अंकुश आवले, नगरसेविका पल्लवी महाडिक, नीलम जाधव, हर्षाली पवार, माजी नगरसेवक परिमल भोसले, शिवसेना चिपळूण तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, रुपेश घाग, माजी नगरसेवक करामत मिठागरी आदी उपस्थित होते.

आमदार निलेश राणे म्हणाले, राजकारणात काम करत असताना ते केवळ निवडणुकीपुरतेच ठेवावे. निवडणूक झाल्यावर विकासकामे व समाजहिताचा विचार करावा. अशी कामे करणारा राजकारणात नेहमीच यशस्वी होतो. जनतेला राजकारणाबद्दल काही देणेघेणे नसते. मात्र, त्यांची कामे झाल्यास निवडणुकीत तुमचा बूथ जरी नसला तरी जनता तुम्हाला मतदान करते. ही बाब कायम लक्षात ठेवून शिवसेनेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेत निवडून गेलेल्या उमेदवारांनी यापुढे आता जनतेच्या कामाचे व्हिजन ठेवावे. विकासाची एक निश्चित दिशा ठरवून त्यानुसार काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मी कामकाजाची पद्धत बदलली आहे. पूर्वीच्या आणि आत्ताच्या पद्धतीत फरक आहे. जनतेची विकासकामे आणि हिताचा विचार करून मी काम करीत आहे. मात्र, माझी पूर्वीची कामाची पद्धत विसरलो नाही. जर कुणाला पूर्वीच्या कामाच्या पद्धतीची आठवण आली तर ती करून देण्याची आपली तयारी आहे. पालकमंत्री सामंत यांचेदेखील आपल्याला नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य मिळते. असंही निलेश राणे यांनी सांगितलं.

सांस्कृतीक, सामाजिक, क्रीडानगरी म्हणून ओळख

चिपळूण हे मध्यवर्ती ठिकाण आहे. सांस्कृतीक, सामाजिक, क्रीडानगरी म्हणून ओळख आहे. त्यात अधिक विकासात्मक भर कशी पडेल याचा निवडून आलेल्यांनी विचार करावा. विकासासाठी प्रकल्प अहवाल, प्रस्ताव तयार करा. नगरविकास खात्याचे मंत्री आपले नेते आहेत. मीही सभागृहात आहे. त्याचा पाठपुरावा मी करीन. महामार्ग उड्डाण पुलासंदर्भात २०२५ मध्येच या पुलाची लांबी वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करून त्याबाबत अंदाजपत्रकासहीत पुलाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो संबंधित विभागाकडे पाठवून झाला आहे. त्याला आता अंतिम स्वरूप येईल आणि प्रांत कार्यालयापासून पाग विश्रामगृहापर्यंत उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू होईल, असा विश्वास चिपळूणवासीयांना राणे यांनी यावेळी दिला.

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्र कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीची विक्री करणाऱ्या दुकानांवर टाकले छापे

Web Title: Mla nilesh rane said that he became active in politics because of eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • nilesh rane

संबंधित बातम्या

Dombivli News: ‘बॅज लावूनच फिरा, म्हणजे पक्ष कळेल’; मनसे मेळाव्यात राजू पाटील यांची दीपेश म्हात्रेंवर सडकून टीका
1

Dombivli News: ‘बॅज लावूनच फिरा, म्हणजे पक्ष कळेल’; मनसे मेळाव्यात राजू पाटील यांची दीपेश म्हात्रेंवर सडकून टीका

‘केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,’ राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत
2

‘केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,’ राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत

Karjat Protest : कर्जतमध्ये आंदोलन तीव्र; 22 दिवसांनंतरही दखल नाही, उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा
3

Karjat Protest : कर्जतमध्ये आंदोलन तीव्र; 22 दिवसांनंतरही दखल नाही, उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?
4

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.