
रुपाली चाकणकरांची ८ तास ED चौकशी; चौकशीनंतर माध्यमांना दिली प्रतिक्रिया
ईडी चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “जेव्हा जेव्हा चौकशीला बोलावलं आहे तेव्हा हजर राहिलो आहे. माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या. अनेक बातम्यांचा विपर्यास केला गेला. खरातसोबत आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता. ईडीच्या चौकशीत मी सगळी उत्तर दिली आहेत. नोटीस मिळण्याआधी तीन दिवसांपूर्वी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. तपासात आम्ही योग्य ते सहकार्य वेळोवेळी केलं आहे. चार साडेचार तास चौकशी झाली. यामध्ये जबाब नोंदवणं, लिहून घेणं, मधला लाँच ब्रेक अश्या बराचसा वेळ होता. मी पहिल्या दिवशी जे सांगितलं ते आजही सांगते खरातशी आमचा कोणताही आर्थिक संबंध नव्हता. कोणत्याही जमिनीत आम्ही पार्टनर नव्हतो. त्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाहीत,” असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, ” आर्थिक व्यवहाराबाबत प्रश्न विचारले गेले परंतु अशोक खरात आणि आमच्यात कोणताही आर्थिक व्यवहार झाला नसल्याने पुढे त्यांना कोणतेही प्रश्न उदभवले नाहीत. SIT चे प्रश्न वेगळे होते तर ED चे प्रश्न वेगळे होते. या तपासाला उत्तम प्रकारे सहकार्य केलेलं आहे. आणि यापुढेही करू.” असे त्या म्हणाल्या.
रुपाली चाकणकर यांच्याप्रमाणेच काही दिवसांपूर्वी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांची पोलीस चौकशी झाली होती. अशोक खरातच्या खरातच्या समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांचे खाते असल्याचे आरोप करण्यात आले होते. याबद्दल रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या. “समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावाची खाती हि बनावट खाती होती. ते दोघेही कधी समता पतसंस्थेत गेले नव्हते त्यांना समता पतसंस्था कुठे आहे हेसुद्धा माहिती नाही. या दोघांच्या त्या खात्यांमधील कागदपत्रांवर सह्या नव्हत्या . जवळजवळ सवाशे ते दीडशे लोकांची बनावट खाती काढलेली आहे. ज्या व्यक्तीला घरातून चालतासुद्धा येत नाही अश्या लोकांचीदेखील बनावट खाती आहेत. त्यामुळे ती खाती खोटी आहेत, आमचा खरातसोबत कोणताही आर्थिक आणि जमिनीचा व्यवहार झालेला नाही,” असे त्या यावेळी म्हणाल्या.
“गडकरी मुख्यमंत्री असते तर…” प्रणिती शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा