Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke AI Surveillance: अमेरिकन AI कंपनीद्वारे माझ्यावर पाळत!; अभिजीत दीपकेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

"माझी सर्व माहिती AI टूलमध्ये सादर करण्यासाठी या कंपनीला परवानगी कोणी दिली? वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे सर्व चालले आहे. सरकार नक्की कोणाला मदत करत आहे?" असा सवाल अभिजीत दीपके यांनी उपस्थित केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 08, 2026 | 02:35 PM
Abhijeet Dipke, Sambhajinagar, CJP, ReSecurity, Future Crime Summit, Cyber Security,

Abhijeet Dipke, Sambhajinagar, CJP, ReSecurity, Future Crime Summit, Cyber Security,

Follow Us
Follow Us:
  • भारतीय नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी अमेरिकन कंपनीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर स्पष्टीकरण मागीतले
  • कोणत्याही सरकारच्या दबावाखाली न येता अल्गोरिदमचा वापर केवळ आक्षेपार्ह मजकूर रोखण्यासाठीच करावा
  • राजकीय मतभिन्नता आणि आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर थांबवण्याची मागणी
Abhijeet Dipke AI Surveillance: नीट पेपरफुटी प्रकरणावर आंदोलन केल्यानंतर चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार सूडबुद्धीने आपल्यावर पाळत ठेवत असून, यासाठी अमेरिकेतील ‘री सिक्युरिटी’ या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित सायबर सुरक्षा कंपनीची मदत घेतली जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, इन्स्टाग्रामवरील त्यांच्या पोस्टची पोहोचही जाणूनबुजून कमी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दीपके यांनी सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट शेअर करत सांगितले की, भारत मंडपम येथे आयोजित ‘फ्युचर क्राइम समिट २०२६’मध्ये ‘री सिक्युरिटी’ने आपल्या एआय टूलचे प्रात्यक्षिक सादर केले. या सादरीकरणादरम्यान स्क्रीनवर त्यांच्या संदभर्भातील माहिती दाखविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

Abhijeet Dipke vs Police: तो एक व्हिडीओ अन् अभिजीत दिपकेंचे पोलिस संरक्षण काढण्याची मागणी; नेमकं कारण काय?

समिटला उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ही बाब दीपके यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेऊन नागरिकांवर पाळत ठेवत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

“माझी सर्व माहिती AI टूलमध्ये सादर करण्यासाठी या कंपनीला परवानगी कोणी दिली? वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे सर्व चालले आहे. सरकार नक्की कोणाला मदत करत आहे?” असा सवाल अभिजीत दीपके यांनी उपस्थित केला आहे.

गोपनीयतेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न

परदेशी कंपनीच्या मदतीने भारतीय नागरिकांवर नजर ठेवली जात असेल, तर तो गोपनीयतेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गंभीर प्रश्न असल्याचे दीपके म्हणाले, त्यांनी सोशल मीडिया कंपन्यांनाही आवाहन करत, कोणत्याही सरकारच्या दबावाखाली येऊन नागरिकांचा आवाज दाबू नये, असे म्हटले. अल्गोरिदमचा वापर केवळ बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह मजकूर रोखण्यासाठी व्हावा, मतभिन्नता दडपण्यासाठी नव्हे, असे त्यानी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला

सरकारकडून पाळत ठेवली जात असल्याचा सवाल

AI टूलच्या प्रात्यक्षिकादरम्यान त्यांच्याशी संबंधित वैयक्तिक माहिती स्क्रीनवर दाखवण्यात आली. मात्र, ही माहिती संबंधित कंपनीकडे कशी पोहोचली आणि ती प्रदर्शित करण्याची परवानगी कोणी दिली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणामुळे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेचा तसेच AI तंत्रज्ञानाच्या वापराचा मुद्दाही चर्चेत आला आहे. मात्र, संबंधित अमेरिकन AI स्टार्टअप किंवा सरकारकडून या आरोपांवर अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

 

 

 

Web Title: Sambhajinagar cjp abhijeet dipke accuses govt of ai surveillance resecurity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • Sambhajinagar News

संबंधित बातम्या

आसाममध्ये आशुतोष रांकासह CJP चे ३० हून अधिक कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा हिमंता बिस्वा सरमांना थेट इशारा
1

आसाममध्ये आशुतोष रांकासह CJP चे ३० हून अधिक कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा हिमंता बिस्वा सरमांना थेट इशारा

Sambhajinagar News : विदेशी नागरिकांची माहिती लपवली तर थेट गुन्हा; हॉटेल-लॉज चालकांना पोलिसांचा इशारा
2

Sambhajinagar News : विदेशी नागरिकांची माहिती लपवली तर थेट गुन्हा; हॉटेल-लॉज चालकांना पोलिसांचा इशारा

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले
3

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा
4

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.