Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संगमनेरात आज तीन जागांसाठी मतदान! कोण होणार नगराध्यक्ष? प्रत्येक उमेदवाराला विजयाची आस

आज म्हणेजच 20 डिसेंबर रोजी संगमनेरात तीन जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदानाचा निकाल उद्या म्हणजेच 21 डिसेंबर 2025 रोजी लागणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 20, 2025 | 03:42 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • आज संगमेरात मतदान
  • मतदानाचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी लागणार
  • कोण होणार संगमनरेचा नगराध्यक्ष?
गोरक्ष नेहे/ संगमनेर: संगमनेर येथील १५ प्रभागांतील २७ नगरसेवकपदांसह नगराध्यक्षपदासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. नगरसेवकपदाच्या ३ जागांसाठी सध्या मतदान होत आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत नगरसेवकपदापेक्षा नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागून आहे.

रविवारी (20 डिसेंबर 2025) मतमोजणी होणार असून, संगमनेरचा नगराध्यक्ष कोण, याचा फैसला होणार आहे. निकाल जवळ आल्याने सध्या सर्वच उमेदवारांची धडधड वाढली आहे. संगमनेरमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेना महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा खताळ, तर विरोधी संगमनेर सेवा समितीकडून आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली यांच्यातच दुरंगी लढत आहे. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार खताळ आणि आमदार तांबे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Kolhapur News : निवडणुकीत गाजणार हद्दवाढीचा विषय ; कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा ठरणार वादाचं कारण ?

तिरंगी, चौरंगी, बहुरंगी लढती

यामध्ये मुस्लिमबहुल भागात सर्वाधिक मतदान झाले आहे. मतदानाचा हा टक्का किती प्रभावी ठरतो, यावरच उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. नगरसेवकपदाच्या निवडणुकीतही राजकीय समीकरणे गुंतागुंतीची ठरली आहेत. संगमनेर सेवा समिती, भाजप-शिवसेना महायुती यांच्यासह राज्याच्या राजकारणात महायुतीचा घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), स्वतंत्रपणे आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काही प्रभागांत तिरंगी, काही ठिकाणी चौरंगी, तर काही ठिकाणी बहुरंगी लढती पाहायला मिळाल्या. यात मतांचे विभाजन कोणाच्या फायद्याचे आणि कोणाच्या तोट्याचे ठरणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

जिल्हा परिषदेसाठी रंगीत तालीम

नगरपरिषदेची रणधुमाळी संपल्यानंतर अवघ्या एक ते दीड महिन्यातच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेचा निकाल त्या निवडणुकीसाठी उपांत्य सामना मानला जात आहे. येथे मिळणारी आघाडी किंवा पिछाडी राजकीय दिशा ठरवणारी ठरू शकते. त्यामुळे भविष्यातील संगमनेरचा खरा किंगमेकर कोण ठरणार, हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल.

‘भाजपला कधी मिळाले नाही तेवढं यश नगरपरिषद निवडणुकीत मिळणार’; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास

या उमेदवारांसाठी होतेय मतदान

प्रभाग एक, दोन, तीन-ब साठी विरोधी उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे तेथील स्थगित केलेले मतदान शनिवारी होत आहे. शिवसेनेचे अभिजित ऊर्फ मुन्ना पुंड, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, इंदिरा नामन, अर्चना दिघे, तसेच अपक्ष दोन उमेदवाराचे राजकीय भवितव्य कसे असेल हे उद्या समजेल.

 

Web Title: Sangamner local body election starts today results on 21 december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Sangamner

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime: जामखेडमध्ये हॉटेल मालकावर गोळीबार! मालक गंभीर जखमी आणि हल्ल्लेखोर फरार
1

Ahilyanagar Crime: जामखेडमध्ये हॉटेल मालकावर गोळीबार! मालक गंभीर जखमी आणि हल्ल्लेखोर फरार

Ahilyanagar News: “जोपर्यंत देवभाऊ तोपर्यंत लाडकी बहीण…”, पाथर्डीत मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे वक्तव्य
2

Ahilyanagar News: “जोपर्यंत देवभाऊ तोपर्यंत लाडकी बहीण…”, पाथर्डीत मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे वक्तव्य

ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणताही परिणाम होणार नाही! राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य
3

ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणताही परिणाम होणार नाही! राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य

Ahilyanagar News: पाण्याचा एक थेंबही देणार नाही! रेल्वेसाठी अकोलेकर आक्रमक; संगमनेरचे आमदारही सहभागी
4

Ahilyanagar News: पाण्याचा एक थेंबही देणार नाही! रेल्वेसाठी अकोलेकर आक्रमक; संगमनेरचे आमदारही सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.