Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali Zilla Parishad महाविकास आघाडीचा झेंडा; संगीता पाटील अध्यक्ष, ऋषीकेश लाड उपाध्यक्ष

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप युतीच्या शीतल बाबर आणि विकास आघाडीच्या प्रतिमा मोरे यांनी शेवटच्या क्षणी रिंगणातून माघार घेतली. यामुळे मुख्य लढत भाजपच्या स्वप्नाली मासाळ आणि आघाडीच्या संगीता पाटील यांच्यात झाली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 18, 2026 | 06:44 PM
Sangli ZP Elect ion 2026 Today, Sangli Zilla Parishad

Sangli ZP Elect ion 2026 Today, Sangli Zilla Parishad

Follow Us
Close
Follow Us:
  • सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक
  • अध्यक्षपदी राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या संगीता पाटील,
  • सांगली जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे वर्चस्व
Sangali ZP News : सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्णायक विजय मिळवत सत्तेवर झेंडा फडकावला. अध्यक्षपदी राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या संगीता पाटील, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषीकेश लाड यांची निवड झाली.

अध्यक्षपदासाठी संगीता पाटील यांना ३४ मते, तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना २४ मते मिळाली. त्यामुळे ९ मतांनी पाटील विजयी ठरल्या. उपाध्यक्षपदासाठीही काँग्रेसचे ऋषीकेश लाड यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत बाजी मारली. निवड प्रक्रियेपूर्वी काही उमेदवारांनी माघार घेतल्याने थेट लढत रंगली. दुपारी सभागृहात हात उंचावून मतदान घेण्यात आले. या वेळी सभागृहात दोन्ही बाजूंच्या नेत्यांची मोठी उपस्थिती होत. महाविकास आघाडीच्या विजयामागे जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, रोहित पाटील यांची एकजूट महत्त्वाची ठरली. तर भाजपकडूनही वरिष्ठ नेते उपस्थित राहिल्याने निवडणूक चुरशीची झाली होती. या विजयामुळे सांगली जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

Sangli Political News: कोण होणार सांगली जिल्हा परिषदेचा ‘ कलेक्टर’; आज सत्तेचा फैसला

निवडणूक चुरस आणि माघार

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप युतीच्या शीतल बाबर आणि विकास आघाडीच्या प्रतिमा मोरे यांनी शेवटच्या क्षणी रिंगणातून माघार घेतली. यामुळे मुख्य लढत भाजपच्या स्वप्नाली मासाळ आणि आघाडीच्या संगीता पाटील यांच्यात झाली.

संगीता पाटील यांचा मोठा विजय

या अटीतटीच्या लढतीत संगीता पाटील यांनी ३४ मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला, तर प्रतिस्पर्धी स्वप्नाली मासाळ यांना २४ मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांची राजकीय रणनीती यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.

Maharashtra Politics : “एकनाथ शिंदेंचा पक्ष म्हणजे भाजपची अंगवस्त्र…; खासदार संजय राऊतांची खरपूस टीका

चुरशीच्या लढतीत भाजपचा पराभव

सांगली जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ऋषिकेश लाड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी भाजप-युतीचे उमेदवार हिम्मत जाधव यांचा पराभव केला. या निवडणुकीत ऋषिकेश लाड यांना ३४ मते मिळाली, तर हिम्मत जाधव यांना २४ मतांवर समाधान मानावे लागले. अध्यक्षपदापाठोपाठ उपाध्यक्षपदावरही विजय मिळवून महाविकास आघाडीने जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

शिंदे सेनेच्या दोन सदस्यांची दांडी

या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील शिंदे सेनेचे दोन सदस्य, जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील, मतदानासाठी गैरहजर राहिले. भाजप-युतीसाठी हे दोन सदस्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते, मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे युतीचे गणित बिघडले. दुसरीकडे, महाविकास आघाडीने आपल्या मतांची योग्य जुळवाजुळव केल्याने ऋषिकेश लाड यांचा विजय सुकर झाला. शिंदे सेनेच्या सदस्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Sangeeta patil of the maha vikas aghadi becomes president and rishikesh lad becomes vice president of the sangli zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • sangli news

संबंधित बातम्या

कोयनेतून सिंचनासाठी विसर्ग सुरू; सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी वाढली
1

कोयनेतून सिंचनासाठी विसर्ग सुरू; सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी वाढली

Kavathe Mahankal: निसर्ग कोपला अन् कर्ज नडलं; मळणगावच्या कष्टकरी शेतकऱ्याचा विदारक अंत
2

Kavathe Mahankal: निसर्ग कोपला अन् कर्ज नडलं; मळणगावच्या कष्टकरी शेतकऱ्याचा विदारक अंत

सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका! गुढीपाडव्याला ६०.९४% प्रवेश पूर्ण; तीन वर्षांत पटसंख्येत १० टक्क्यांची विक्रमी वाढ
3

सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका! गुढीपाडव्याला ६०.९४% प्रवेश पूर्ण; तीन वर्षांत पटसंख्येत १० टक्क्यांची विक्रमी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.