खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरवर टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधून विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊत म्हणाले की, तुम्ही जे म्हणताय ऑपरेशन टायगर ठीक आहे, मूळात शाह आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजर केलेली आहे. सत्ता, पैसा आहे मोठ्या प्रमाणात. तपास यंत्रणा आहेत, निवडणूक यंत्रणा हाताशी आहे. त्याचा गैरवापर करुन हे आमिष दाखवतात, धमक्या देतात. हे फारकाळ चालणार नाही, अशी टीका खासदार राऊतांनी केली.
हे देखील वाचा : इतिहास घडला! LGBTQ+ समुदायाला संसदेत प्रतिनिधित्व; जाणून घ्या कोण आहेत मेनका गुरुस्वामी?
पुढे ते म्हणाले की, “दिल्लीत आपण ज्यांची नाव घेताय ते नेहमीच येत असतात. उपमुख्यमंत्री शिंदे असतील हे जे पक्ष आहेत, ते पक्ष म्हणजे भाजपची अंगवस्त्र आहेत अणि अमित शाह यांनी स्थापन केलेले पक्ष आहेत. अजित पवारांचा पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष नाही. एकनाथ शिंदे यांचा गट बाळासाहेबांचा पक्ष नाही. हे अमित शाह यांनी स्थापन केलेले पक्ष आहेत. नरेंद्र मोदी त्यांचे मार्गदर्शक आहेत. आमचे मार्गदर्शक बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकेर, उद्धव ठाकरे हे आहेत, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
पुढे संजय राऊत यांनी टायगर ऑपरेशनवर टीका केली. ते म्हणाले की, “इथे जर ऑपरेशन टायगर करायला कोणी आलं असेल तर त्यांनी दिल्लीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. या दिल्लीला पानीपतापासून मोगलकाळापासून फार मोठा इतिहास आहे. इथे असं ऑपरेशन करायला आले ते निर्वस्त्र होऊन आपल्या राज्यात गेलेत. परागंदा त्यांना व्हाव लागलं. या दिल्लीतून कधी ना कधी प्रत्येकाला जावच लागत. ही दिल्ली कोणाची नाही हे ऑपरेशन करायाला येणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे” अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला.
हे देखील वाचा : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही; ‘या’ नेत्याने केला तीव्र विरोध






