Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: जिल्हा बँकेसाठी ९३.९१ टक्के मतदान सहा जागांचा फैसला मतपेटीत, जत-तासगाव-कवठेमहांकाळच्या निकालाकडे लक्ष

Sangli District Bank Election Voting: सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १२ मतदान केंद्रांवर ९३.९१ टक्के मतदान झाले असून जत, तासगाव आणि कवठेमहांकाळच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 01, 2026 | 07:39 PM
Sangli District Bank Election Voting

Sangli District Bank Election Voting

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा बँकेच्या सत्तेचा फैसला मतपेटीत
  • बंद सहा जागांसाठी १३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार
  • मंगळवारी निकालाचा फैसला
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानात तब्बल ९३.१ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. २१ पैकी १५ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित सहा जागांसाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. विशेषतः जत, तासगाव आणि कवठेमहांकाळमधील राजकीय प्रतिष्ठेच्या लढतींच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी (ता. ३) मतमोजणी होणार असून, त्यातून जिल्हा बँकेच्या सत्ताकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. (Sangli )

Baramati: गर्दीतून नजर पडली अन् शरद पवारांनी ताफा थांबवला; भवानीनगरमध्ये कामगार नेते युवराज रणवरेंची घेतली भेट

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २०२६-२०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान झाले. जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज या चार सोसायटी गटांसह अनुसूचित जाती आणि भटक्या जाती-जमाती या दोन राखीव प्रवर्गांतील जागांसाठी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर एकूण २ हजार ४४६ मतदार मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी दिवसअखेर ९३.९१ टक्के मतदानाची नोंद झाली.

सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची लगबग पाहायला मिळाली. आपापल्या गटातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी उमेदवार आणि समर्थकांकडून विशेष प्रयत्न सुरू होते. सुरुवातीच्या टप्प्यात काही केंद्रांवर मतदानाचा वेग संथ होता. मात्र, जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसा मतदानाचा वेग वाढला. दुपारनंतर अनेक केंद्रांवर मतदारांची गर्दी झाली. अखेर सायंकाळी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा ९३.९९ टक्के मतदानाची नोंद झाली.

जत, तासगावमध्ये प्रतिष्ठेची लढत

या निवडणुकीत जत सोसायटी गटात आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार, तासगावमध्ये माजी खासदार संजय पाटील विरुद्ध माजी आमदार सुमन पाटील, तर कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे विरुद्ध टी. व्ही. पाटील अशी प्रमुख लढत झाली. या तिन्ही लढतींमध्ये स्थानिक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जत गटातील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीचा विषय न्यायालयापर्यंत पोहोचला होता. अखेर त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. या गटातील निकालाकडे भाजपसह विरोधी राजकीय गटांचे लक्ष लागले आहे. तासगावमध्ये सुमन पाटील यांच्या उमेदवारीमुळे आमदार रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी खासदार संजय पाटील यांच्यासाठीही ही लढत महत्त्वाची मानली जात आहे. कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे आणि टी. व्ही. पाटील यांच्यातील लढतीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता आहे.

मिरजसह राखीव प्रवर्गातील निकालही महत्त्वाचे

मिरज सोसायटी गटात अण्णासाहेब कोरे आणि भाजपचे अनिल शेगुणशे यांच्यात सामना झाला. या गटातील निकालाकडे खासदार विशाल पाटील यांचेही लक्ष लागले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून के. डी. कांबळे, बाबासाहेब मधाळे आणि विलास बेले, तर भटक्या जाती-जमाती प्रवर्गातून संभाजी कचरे, शंकर माने आणि अमोल पारेकर यांच्यात लढत झाली. या दोन जागांसाठी जिल्हाभरातील मतदारांनी मतदान केले.

जतमध्ये गोपनीयतेवरून मतदान प्रक्रिया ठप्प

जत येथील मतदान केंद्रावर मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप करीत माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि त्यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा मतदान सुरू करण्यात आले. या घटनेचा अपवाद वगळता जिल्ह्यातील अन्य मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा सहकार उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी काम पाहिले. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मतदान आणि मतमोजणी केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. मतदान केंद्रांवर प्रवेशापूर्वी मतदारांची तपासणी करण्यात येत होती. मोबाईल, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि पेन यांसह प्रतिबंधित वस्तू मतदान केंद्रात नेण्यास मनाई करण्यात आली होती.

आता सर्वांचे लक्ष मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड येथील शेतकरी भवनात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. सहा जागांच्या निकालातून जिल्हा बँकेच्या राजकारणात कोणाचे वर्चस्व निर्माण होणार, कोणाला धक्का बसणार आणि आगामी काळातील सहकार क्षेत्राची राजकीय दिशा कोण ठरवणार, याचे उत्तर मतमोजणीनंतर मिळणार आहे.

मतदानाची अंतिम आकडेवारी

  • एकूण मतदार : २,४४६
  • अंतिम मतदान : ९३.९१ टक्के
  • मतदान केंद्रे : १२
  • निवडणूक होत असलेल्या जागा : ६
  • निवडणूक रिंगणातील उमेदवार : १३
  • बिनविरोध झालेल्या जागा : १५

‘सुरक्षित’ मतदार थेट मतदान केंद्रावर

सहा जागांसाठी अटीतटीची लढत असल्याने मतांची जुळवाजुळव करण्यासाठी नेत्यांनी विशेष खबरदारी घेतली होती. आपापल्या गटातील मतदार फुटू नयेत, विरोधकांच्या गळाला लागू नयेत, यासाठी अनेक नेत्यांनी मतदानापूर्वीच आपल्या मतदारांना पर्यटनस्थळी हलविले होते. मतदानाच्या दिवशी या मतदारांना कडेकोट बंदोबस्तात थेट मतदान केंद्रांवर आणण्यात आले. मतदान करून घेतल्यानंतर त्यांना पुन्हा सुरक्षितपणे रवाना करण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांची ही ‘सुरक्षित पर्यटन मोहीम’ जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चांगलीच चर्चेचा विषय ठरली. मतपेटीत कोणाच्या पारड्यात किती मते पडली, हे आता निकालादिवशीच स्पष्ट होणार आहे.

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती

💡

Frequently Asked Questions

  • Que: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत किती टक्के मतदान झाले?

    Ans: सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १२ मतदान केंद्रांवर ९३.९१ टक्के मतदानाची नोंद झाली.

  • Que: सांगली जिल्हा बँकेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली?

    Ans: संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांपैकी १५ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित सहा जागांसाठी निवडणूक झाली.

  • Que: सांगली जिल्हा बँकेची मतमोजणी कधी आणि कुठे होणार?

    Ans: मंगळवार, ३ तारखेला सकाळी ८ वाजता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड येथील शेतकरी भवनात मतमोजणी होणार आहे

Web Title: Sangli district bank election 2026 six seats 9191 voting percentage results pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • Jat taluka
  • Sangli District Bank
  • sangli news
  • Satara District Bank Election

संबंधित बातम्या

Satara News: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विक्रमी मतदान;२८ उमेदवारांचे भवितव्य बंदिस्त; ९७.९२ टक्के मतदानाचा उच्चांक
1

Satara News: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विक्रमी मतदान;२८ उमेदवारांचे भवितव्य बंदिस्त; ९७.९२ टक्के मतदानाचा उच्चांक

Sangli News : ‘सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ गोपीचंद पडळकरांनी मंत्री शंभूराजांना सुनावलं, पाणीप्रश्नावरून बैठकीत राडा
2

Sangli News : ‘सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ गोपीचंद पडळकरांनी मंत्री शंभूराजांना सुनावलं, पाणीप्रश्नावरून बैठकीत राडा

Sangli News: सांगलीत 52 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा थरार; 1200 खेळाडूंचा सहभाग
3

Sangli News: सांगलीत 52 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा थरार; 1200 खेळाडूंचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.