Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वातंत्र्यादिनाच्या दिवशीच तिरंग्याचा खुलेआम अपमान, संभाजी भिडे पुन्हा वादात; ‘हिंदुस्थानचा ध्वज भगवाचं’ म्हणत काढली पदयात्रा

सांगलीत संभाजी भिडेंच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली. भगवे ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांसह शेकडो धारकरी सहभागी झाले. या पदयात्रेवरून काँग्रेसने टीका केली असून, भाजपने तिरंगाच देशाचा राष्ट्रध्वज असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 15, 2026 | 02:50 PM
संभाजी भिडे पुन्हा वादात; 'हिंदुस्थानचा ध्वज भगवाचं' म्हणत काढली पदयात्रा

संभाजी भिडे पुन्हा वादात; 'हिंदुस्थानचा ध्वज भगवाचं' म्हणत काढली पदयात्रा

Follow Us
Follow Us:
  • संभाजी भिडेंच्या नेतृत्वाखाली सांगलीत हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा
  • भगवे ध्वज आणि शिवराय-संभाजीराजेंच्या प्रतिमांसह शेकडो धारकरी सहभागी
  • राष्ट्रध्वजाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची टीका; भाजपकडून तिरंग्याबाबत स्पष्टीकरण
 

सांगली : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण असतानाच सांगलीमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. ‘हिंदुस्थानचा ध्वज भगवाचं’ असल्याचे पोस्टर्स हातात घेऊन सांगली शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘हिंदवी स्वातंत्र्य दिन’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते.

पदयात्रेत सहभागी धारकऱ्यांच्या हातात भगवे ध्वज दिसून आले. याशिवाय भारतमातेची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमाही हातात घेण्यात आल्या होत्या. काही धारकऱ्यांकडे बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोही पाहायला मिळाले. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान झाल्याचे निदर्शनास येत असून यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

अखंड हिंदुस्थानचे स्वप्न हा पदयात्रेचा उद्देश – शिवप्रतिष्ठाण

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, अखंड भारताच्या संकल्पनेचा प्रचार करण्याच्या उद्देशाने ही पदयात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्यानंतर अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पुढे नेण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, या पदयात्रेशी संबंधित एक पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या पोस्टरमधील मजकुरावरून राष्ट्रध्वज आणि भगव्या ध्वजाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Rahul Gandhi Independence Day 2026: स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदारी; स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींचा खास संदेश

काँग्रेसकडून संभाजी भिडेंवर निशाणा

या पदयात्रेवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच राष्ट्रध्वजाचा अवमान केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. वंदे मातरमच्या कथित अवमानाबाबत कारवाईची भूमिका घेतली जाते, तर राष्ट्रध्वजाच्या कथित अवमानाबाबत वेगळी भूमिका का, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.

स्वातंत्र्यादिनाच्या दिवशी मनोहर भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करतो. वंदेमातरमचा अपमान झाला तर शिक्षा आहे मग राष्ट्रध्वजाचा अवमान कसा खपवून घेतला जाऊ शकतो?
५२ वर्षे आपल्या कार्यालयावर तिरंगा न फडकावणाऱ्यांना आता तिरंगा यात्रा काढावीशी वाटली. पण भिडेवर गुन्हा दाखल करणार का? हा… pic.twitter.com/pU5ODo2QYK
— Sachin M. Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 15, 2026

आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत सचिन सावंत म्हणाले, “स्वातंत्र्यादिनाच्या दिवशी मनोहर भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करतो. वंदेमातरमचा अपमान झाला तर शिक्षा आहे मग राष्ट्रध्वजाचा अवमान कसा खपवून घेतला जाऊ शकतो? ५२ वर्षे आपल्या कार्यालयावर तिरंगा न फडकावणाऱ्यांना आता तिरंगा यात्रा काढावीशी वाटली. पण भिडेवर गुन्हा दाखल करणार का? हा आमचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. तशी आमची मागणी ही आहे,” असे ते म्हणाले.

भाजपकडून तिरंग्याबाबत स्पष्ट भूमिका

दुसरीकडे, भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली. कोण काय म्हणते याला महत्त्व नसून तिरंगा हाच भारताचा राष्ट्रध्वज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भगवा हा हिंदू समाजाचा स्वाभिमान असल्याचे सांगतानाच देशाचा अधिकृत राष्ट्रध्वज तिरंगाच असल्याचे गोरे यांनी नमूद केले. त्यामुळे सांगलीतील या पदयात्रेनंतर भगवा ध्वज, राष्ट्रध्वज आणि अखंड हिंदुस्थानच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

Web Title: Sangli sambhaji bhide hindavi swatantra din padyatra congress bjp reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Independence Day 2026
  • sambhaji bhide
  • Sangli

संबंधित बातम्या

सांगली शिक्षक बँकेत सभेदरम्यान गोंधळ, तरीही ४ मोठे निर्णय; मासिक वर्गणी १३०० वरून १ हजारावर
1

सांगली शिक्षक बँकेत सभेदरम्यान गोंधळ, तरीही ४ मोठे निर्णय; मासिक वर्गणी १३०० वरून १ हजारावर

Sangli News : शिक्षक बँकेच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करा; जागा खरेदी, इमारत बांधकामासह 10 कोटींच्या खर्चावर प्रश्न
2

Sangli News : शिक्षक बँकेच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करा; जागा खरेदी, इमारत बांधकामासह 10 कोटींच्या खर्चावर प्रश्न

सांगली शिक्षक बँकेची ७४ वी वार्षिक सभा रविवारी; ५ टक्के लाभांशाची घोषणा, कर्जमर्यादा २० लाखांवर
3

सांगली शिक्षक बँकेची ७४ वी वार्षिक सभा रविवारी; ५ टक्के लाभांशाची घोषणा, कर्जमर्यादा २० लाखांवर

Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ
4

Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.