Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: मनपा निवडणुकीत दादा- भैयांची प्रतिष्ठा पणाला! खासदार लंके यांची एकाकी लढत

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी संग्राम जगताप आणि सुजय विखे पाटील सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे खासदार लंके देखील सक्रिय झाल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 12, 2026 | 07:04 PM
मनपा निवडणुकीत दादा- भैयांची प्रतिष्ठा पणाला!

मनपा निवडणुकीत दादा- भैयांची प्रतिष्ठा पणाला!

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम
  • दादा- भैयांची प्रतिष्ठा पणाला
  • निवडणुकीत कोण मारणार बाजी?
सुहास देशपांडे/अहिल्यानगर:महापालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांनी जोर लावला असून दादा-भैय्या (माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अंतिम टप्प्यात खासदार नीलेश लंके सक्रिय झाल्याने लढत अधिकच चुरशीची झाली आहे. भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीला कडवी टक्कर देताना विरोधकांची मोठी दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकीत भाजप–राष्ट्रवादी युती, शिंदे शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक चार या मुस्लिमबहुल भागात एमआयएम आणि समाजवादी पक्ष यांच्यात मुख्य लढत असली तरी अखेरच्या टप्प्यात काँग्रेसनेही तेथे जोर पकडला आहे. हा भाग वगळता शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये युती, शिवसेना आणि मविआ यांच्यात सरळ लढत होत आहे.

वचननामा, संकल्पनाम्याचे राजकारण! कोणाच्या विकास पुस्तिकेवर ‘विश्वास’ दाखवायचा? मतदारांना प्रश्न

शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मोठ्या संख्येने असल्याने आपापल्या जागा राखण्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप या दोन युवा नेत्यांनी संपूर्ण निवडणूक प्रचार, नियोजन आणि यंत्रणेवर पकड ठेवली आहे. एकीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन सुरू असतानाच, दुसरीकडे भाजपमधील नाराज निष्ठावंतांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. अखेरच्या टप्प्यात नाराज कार्यकर्तेही सक्रिय झाल्याने भाजप, पर्यायाने युतीची ताकद वाढल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा भाजप–युतीसाठी मोठे बळ ठरत आहे. राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांनी व्यूहरचना आखत प्रचारात मुसंडी मारली असून वैयक्तिक गाठीभेटींवर त्यांचा विशेष भर आहे. भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा, मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारफेऱ्या, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सभा आणि फेऱ्या पार पडल्या. राष्ट्रवादीचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियोजित सभा मात्र अचानक रद्द झाली.

Ajit Pawar News: अजित पवारांनी ओवैसींना झापले! हिजाबच्या राजकारणावरून ओवैसींवर निशाणा, म्हणाले – “फालतू विधानांपेक्षा…..”

शिंदे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याऐवजी मंत्री उदय सामंत यांची सभा जाहीर करण्यात आली आणि तीही रद्द होऊन अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांची सभा पार पडली. महाविकास आघाडीकडून खासदार नीलेश लंके ‘किल्ला लढवत’ असून काँग्रेस नेते खासदार इम्रान प्रतापगडी यांची सभा झाली. मात्र ही सभा मुस्लिमबहुल भागातच झाल्याने शहरातील इतर भागात तिचा फारसा प्रभाव जाणवला नाही.

कर्णकर्कश रविवार

मतदानापूर्वी आलेल्या रविवारच्या सुटीचा सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी पुरेपूर फायदा घेतला. सुटीच्या दिवशी घरी असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी घरोघरी भेटी देण्यावर भर दिला. तसेच प्रचारासाठी ध्वनिक्षेपक लावलेल्या रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. आवाजाच्या मर्यादा पाळल्या न गेल्याने हा रविवार शहरासाठी अक्षरशः कर्णकर्कश ठरला.

शिंदेंच्या शिवसेनेची ‘एकला चलो रे’ स्थिती

प्रचारासाठी राज्यस्तरीय नेते न आल्याने शिंदे शिवसेनेत काहीशी अस्वस्थता दिसून येत आहे. पक्षाचे बहुतांश स्थानिक नेते स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने ते आपापल्या प्रभागांपुरते मर्यादित राहिले आहेत. परिणामी नव्या उमेदवारांना अपेक्षित ताकद मिळण्यात अडचणी येत आहेत.

दादा-भैय्यांचे प्रचार यंत्रणेवर बारीक लक्ष

प्रचाराचे अखेरचे काही दिवस शिल्लक राहिले असून कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि पकडलेला जोर ढिला पडू नये यासाठी डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी प्रचार यंत्रणेवर बारीक लक्ष ठेवले आहे.

Web Title: Sangram jagtap and sujay vikhe patil planning to win ahilyanagar municipal election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Ahilyanagar politics
  • Marathi News
  • Sujay Vikhe-Patil

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.