Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नरेंद्र मोदींनी देशासोबत विश्वासघात केला…; डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी जाहीर केल्यामुळे विरोधक भडकले

India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. भारतीय सैनिकांच्या पाठीशी उभे राहिले नसल्याची टीका संजय राऊतांनी केली.

  • By प्रीति माने
Updated On: May 11, 2025 | 01:45 PM
Sanjay Raut is aggressive over US President Donald Trump mediation in India Pakistan war

Sanjay Raut is aggressive over US President Donald Trump mediation in India Pakistan war

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. मात्र या युद्धबंदीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यामुळे अनेक भारतीयांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. भारताबाबत अमेरिकेने निर्णय घेतल्यामुळे ही नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत आणून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहेत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युद्धबंदीच्या घोषणेवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येते. हे चुकीचं आहे. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी स्वीकारली. डोनाल्ड ट्रम्प यांचा सबंध काय?  माणसं आमची मेली मग, ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प मध्यस्थीत कोणत्या अधिकाराने करतात. भारत स्वतंत्र राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्ध बंद करतो. कोणत्या आधारावर आणि अटी शर्थीवर बंद केला ते सांगा, असा शब्दांत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भारत पाकिस्तान युद्धाबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा

अकलेचे दिवे पाजळणाऱ्या भारताच्या प्रधानमंत्रींना…

पुढे संजय राऊत म्हणाले की, न्यूक्रेल आणि रशियाच्या युद्धामध्ये मोदींनी जाहिरात केली होती की पापाने वॉर रुका दिया. आता अमेरिकेच्या पापाने वॉर थांबवला का? पूर्ण बदला घेणार पाकिस्तानचे तुकडे करणार ही भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदींची होती. आता पाकिस्तानचे तुकडे कुठे गेले? भारताची जगामध्ये बेअब्रू झालेली आहे. पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीचा स्टेटमेंट आम्ही युद्ध जिंकलो. अकलेचे दिवे पाजळणाऱ्या भारताच्या प्रधानमंत्रींना हे शोभत नाही. कोणत्या अटी शर्ती वर तुम्ही युद्ध थांबवलं. यासाठी सर्व पक्ष बैठक घ्यावी आणि त्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहणार हे आवश्यक आहे. त्यांना पळ काढता येणार नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

अमित शहा ट्रम्प कडे जाऊन रडत आहेत का?

युद्धबंदीची खरच गरज होती का? कराची सह इतर ठिकाणी बॉम्ब टाकले असे सांगत होते मग माघार घ्यायची गरज का? ही वेळ पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची होती. भारतीय सैन्याचा मनोबल उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली प्रेसिडेंट ट्रम्पसाठी सैन्याचा आणि देशाचे मनोबल उध्वस्त केलं. गुजरातचे मुख्यमंत्री मोदी असताना 26/ 11 हल्ल्या वेळी हे सांगत होते की ओबामाकडे जाऊन हे रडतात, वाचवा म्हणून आता मोदी, अमित शहा ट्रम्प कडे जाऊन रडत आहेत का? भारत सरकारने काहीच केलं नाही. भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत घालून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहे. नुकसान पाकिस्तानचा झालं नाही आमचं झालं आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मोदी यांनी देशात सोबत विश्वासघात केला

ट्रम्पने इस्त्राईल व गांजा पट्टी युद्ध का नाही थांबवलं ? ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे आहेत. मात्र मोदींचे मित्र ट्रम्प भारताच्या मागे उभे राहिले नाही. दोन्ही देशांसोबत चांगले संबंध आहेत असे त्यांनी सांगितले. मोदी पाचशे देश फिरून आले मात्र भारताचा मित्र कोण त्यांनी सांगावं. या युद्धाला ठामपणे पाठिंबा देणारा एकही देश दाखवा. लोकांना इंदिरा गांधींची आठवण येते. 1971 साली अमेरिकेच्या प्रेसिडेंट याला सांगितलं होतं तुम्ही कोणताही निर्णय घ्या आणि पाकिस्तान बरोबर युद्ध करणार आणि करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागितला पाहिजे. मोदी यांनी देशात सोबत विश्वासघात केला, अशी गंभीर शब्दांत खासदार संजय राऊक यांनी टीका केली आहे.

Web Title: Sanjay raut is aggressive over us president donald trump mediation in india pakistan war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Donald Trump
  • India Pakistan Ceasefire
  • india pakistan war

संबंधित बातम्या

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
1

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा
2

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी
3

‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त
4

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.