अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारत पाकिस्तान युद्धविरामावर प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला संशय (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा जीव गेला. यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करुन 100 हून अधिक दहशतनाद्यांचा खात्मा केला. मात्र यामुळे पाकिस्तानने भारतीय राज्यांवर ड्रोन केले. 400 ड्रोन हल्ले केले असल्याचे भारतीय सेनेकडून सांगण्यात आले. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला. मात्र यावेळी ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संशय व्यक्त केला आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाठिंबा देण्याची भूमिका अनेक देशांनी घेतली आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १० मे रोजी संध्याकाळी ५:३७ वाजता सोशल मीडिया पोस्ट केली. यामध्ये त्यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा दावा केला होता. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री आणि भारतीय परराष्ट्र सचिवांनी याबद्दल अधिकृत घोषणा केली. यावेळी ट्रम्प यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधील काश्मीरच्या उल्लेखावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संशय घेत अमेरिका दुटप्पी भूमिका घेत असल्याचा दावा केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारत पाकिस्तान युद्धबंदीवर प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी परखड भूमिका मांडली आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. आणि म्हणूनच, भारताचा अविभाज्य मुद्दा आहे! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या विधानात काश्मीरचा उल्लेख का केला आहे? भारताने पाकिस्तानवर प्रत्युत्तर देण्याचे कारण म्हणजे भारतीय भूमीवर पाकिस्तानचा राज्य पुरस्कृत दहशतवाद. काश्मीरचा उल्लेख करून अमेरिका पाकिस्तानला खूश करत आहे. तुमची भूमिका काय आहे?”असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना विचारला आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
पुढील पोस्टमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आणखी एक चिंताजनक बाब आहे. पाकिस्तानसोबत व्यापार वाढवून, अमेरिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या समर्थित पाकिस्तानमध्ये रूपांतरित करण्यास मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर ही खरोखरच चिंताजनक गोष्ट आहे! आर्थिकदृष्ट्या समर्थित पाकिस्तान सीमापार दहशतवादाला अधिक प्रोत्साहन देईल,” असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
There is one more striking concern.
By boosting trade with Pakistan, the U.S. is helping transform a financially struggling Pakistan into one that is economically supported.@PMOIndia, @DrSJaishankar this is really worrying!
A financially-backed Pakistan will sponsor more… https://t.co/Ey3QfXbBwV— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 11, 2025
काय होती डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १० मे रोजी संध्याकाळी ५:३७ वाजता सोशल मीडिया पोस्ट केली. यामध्ये त्यांनी लिहिले की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि ग्रेट इंटेलिजन्स वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद! अशी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्ट केली. तसेच दोन्ही देशांमध्ये काश्मीर समस्येवरही तोडगा काढणार आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी दोन्ही देशांसोबत काश्मीर मुद्यावरही चर्चा करणार आहे. हजार वर्षानंतर काश्मीर मुद्यावर चर्चा होणार, यावर तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे ही चर्चा करु असे ट्रम्प यांनी म्हटले. यासाठी देव भारत आणि पाकिस्तानला चांगल्या नेतृत्त्वासाठी आशिर्वाद देवो. असेही ट्रम्प यांनी म्हटले होते.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 10, 2025