mp sanjay raut reaction on raj thackeray and uddhav Thackeray alliance in mumbai elections 2025
मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताकडून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले जाणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी भारताने सिंधू जल करार रद्द केला असून डिजीटल स्ट्राईक देखील केली आहे. केंद्र सरकारकडून देशातील अनेक शहरांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. आमचा युद्ध सराव होणार आहे, म्हणजे आमच्या हातात बंदूका देणार आहेत का? असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आमच्या हातात बंदूका देणार आहेत का?
खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी देखील केंद्र सरकारने घेतलेली भूमिका पटलेली नसल्याचे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. देशात होणार रेड सायरन आणि मॉक ड्रिलवरुन देखील त्यांनी टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “आज 15 दिवस झालेत. 27 जणांचे बळी गेले त्याचा बदला काय? जपानने पाठींबा दिला, पुतीनने पाठिंबा दिला. दिल्लीत चर्चा सुरु आहेत. मॉक ड्रिल होणार आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. जनतेला तुम्ही मानसिक दृष्ट्या अडकून ठेवलं आहे. आमचा युद्ध सराव होणार आहे, म्हणजे आमच्या हातात बंदूका देणार आहेत का?” असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे राऊत म्हणाले की, “देशाची जनता देशाच्या स्वाभिमानासाठी सामना करायला तयार आहे. पाकिस्तानमध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहेत. भारतात सुद्धा २ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे. आम्ही उणेदुणे काढणार नाही. आम्ही देशासोबत आहोत, सरकार सोबत आहोत, पक्षासोबत नाहीत. मॉक ड्रिल काय आहे? सायनर वाजणार, ब्लॅक आऊट होणार, रहदारी थांबेल. कोरोना युद्ध आम्ही बघितलं. नरेंद्र मोदी यांची ५६ इंचाची छाती यात दिसणार नाही तरी देशाची छाती दिसेल. खरचं तुम्ही युद्ध करणार असाल तर सगळ्या पक्षांना एकत्र घ्या, चर्चा करू, आम्ही देशासोबत आहेत. यात आम्ही राजकारण करणार नाही,” असे मत खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याला अमित शाह जबाबदार
खासदार राऊत म्हणाले की, “देशामध्ये जी अराजक स्थिती मागील काही दिवसांत निर्माण झाली त्याला गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांना युद्धानंतरची स्थिती सांभाळता येणार नाही, त्यासाठी बदल करावे लागतील. यामध्ये इंटेलिजन्स फेल्युअर आहे त्याला जबाबदार अमित शाह आहेत. जर देश सुरक्षित ठेवायचा असेल तरी अमित शाह यांचा राजीनामा घ्या. अंतर्गत सुरक्षा त्यांच्या हातात देणं हा एक खतरा आहे,” अशा शब्दांत खासदार राऊत यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.