Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Municipal Election: साताऱ्यात 77 अपक्षांचा झंझावात; प्रचार मुदतवाढीने निवडणुकीत नव्या रंगत

साताऱ्यात भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 29, 2025 | 10:00 PM
Satara Municipal Election:

Satara Municipal Election:

Follow Us
Close
Follow Us:
  • सातारा शहरात अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा
  • शिवेंद्रसिंह राजे यांनी कंबर कसली
  • शिवेंद्रसिंह राजेकडून भाजपचे उमेदवार म्हणून प्रत्येक 50 उमेदवारांच्या कोपरा सभा
Satara News: राज्य निवडणूक आयोगाने एक दिवसाची प्रचारासाठी मुदतवाढ दिल्याने सातारा शहरात अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे .भाजपच्या उमेदवारांना तब्बल 77 अपक्ष उमेदवारांचे आव्हान मिळाले असून आता साताऱ्यात खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळीने वेग घेतला आहे .सातारा शहरात ठीक ठिकाणी कोपरासभा प्रचार सभा उमेदवारांच्या प्रचाराच्या फिरणाऱ्या रिक्षा यामुळे सातारकरांनी प्रचाराचा माहोल खऱ्या अर्थाने अनुभवला आहे.

सातारा शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीने खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून ५० उमेदवारांचे पॅनल उभे केले आहे .मात्र या राजकीय रणधुमाळीत इच्छुकांना संधी न मिळाल्याने त्यांच्याच गटातील अपक्ष 77 उमेदवारांनी त्यांनाच आव्हान दिले आहे .तसेच नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा नऊ उमेदवार आहेत .दिनांक 26 रोजी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाल्यानंतर 178 उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे .सातारा शहरात खऱ्या अर्थाने आता राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे .अपक्षांना आपले चिन्ह जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी 72 तास मिळाले आहेत .राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर ठेवली होती .मात्र त्यामध्ये वाढ करून एक नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराला मुदतवाढ देण्यात आली आहेत्यामुळे अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Politics: तळकोकणात वाद तर रत्नागिरीमध्ये महायुतीचा विजयाचा दावा; ‘मविआ’चे टेंशन वाढले

शिवेंद्रसिंह राजे यांनी कंबर कसली मात्र अपक्ष ही जोरात

साताऱ्यात भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे .खासदार उदयनराजे भोसले यांच्या अनुपस्थितीत शिवेंद्रसिंह राजे भाजपचे उमेदवार म्हणून प्रत्येक 50 उमेदवारांच्या कोपरा सभा आणि जाहीर प्रचारासाठी सातत्याने रस्त्यावर फिरत आहेत .भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार करणाऱ्या रिक्षा प्रभागातून सातत्याने दिसून येत आहेत .सध्या तरी भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे .नगराध्यक्ष पदाची लढत भाजपचे उमेदवार अमोल मोहिते व महाविकास आघाडीचे उमेदवार सुवर्णाताई पाटील यांच्यामध्ये होत आहे .दोन्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी सातारा शहराचा कानाकोपरा पिंजून काढला आहे .मतदारांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्यांना दोन डिसेंबरची मतदान प्रक्रियेची आठवण करून दिली जात आहे .अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यापासून त्यांच्या प्रचाराने आता गती घेतली आहे .त्यांच्या प्रत्येक प्रभागांमध्ये वैयक्तिक गाठीभेटीचे दोन दौरे झाले पण आता चिन्हासह पुन्हा मतदार राजा पर्यंत जाऊन त्यांना चिन्हाची आठवण करून दिली जात आहे .महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी चर्चा घडण्याऐवजी मनोमिलनाच्या उमेदवारांना अपक्षांची कडवी लढत असे काहीसे वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.

Chhatrapati Sambhajinagar News: रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पात कोणालाही बेघर होऊ देणार नाही: मुख्यमंत्र्यांची हमी

विकासाचा वचन नामा कोठे आहे ?

प्रत्येक निवडणुकीमध्ये विकासाचा जाहीरनामा देऊन त्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जात असते. मनोमिलनात जेव्हा दोन्ही आघाड्यांचे समोरासमोर लढत होत असेल तेव्हा विकासाचा जाहीरनामा हा महत्त्वाचा ठरत होता .यंदा भारतीय जनता पार्टीने वचननामा प्रसिद्ध केला तरी त्याची फारशी चर्चा होताना दिसत नाही .अपक्षांनी सुद्धा आपले प्रसिद्धीपत्रक तयार करून त्यामध्ये वचन नामा दिला तरी त्यातील मुद्दे नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना त्या मुद्द्यांवर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात उमेदवारांना भलतीच कसरत करावी लागत आहे .सातारा शहराच्या वाढीव क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास ,नवीन आयटी पार्क ,औद्योगिक क्षेत्राचे मजबुतीकरण ,पाणीपुरवठ्याच्या मुबलक सोयी हे विकासाचे ढोबळ मुद्दे आहेत .मात्र अपुरी पार्किंग व्यवस्था ,तसेच वाढती अतिक्रमणे,अपुरी परिवहन व्यवस्था,अशा विविध समस्यामुळे सातारकर वैतागलेले आहेत याबाबतचे कोणतेही विजन अपक्ष उमेदवाराकडून सादर होताना दिसत नाही.

Web Title: Satara election heat bjp vs 77 independents as campaign gets one day extension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 10:00 PM

Topics:  

  • Satara News
  • Satara Politics

संबंधित बातम्या

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर
1

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले
2

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

Phaltan News: फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दिमाखदार उद्घाटन
3

Phaltan News: फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दिमाखदार उद्घाटन

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
4

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.