Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजान पढता है क्या, असं विचारलं…; कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितली करुण कहानी

Pahalgam Terror Attack News : पहलगाम दहशदवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. शरद पवार यांनी गणबोटे परिवाराची भेट घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2025 | 01:32 PM
ncp leader sharad pawar reaction on uddhav and raj thackeray morcha for marathi language

ncp leader sharad pawar reaction on uddhav and raj thackeray morcha for marathi language

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : जम्मू-काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली. पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करुन त्यांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या दहशदवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सहा जण महाराष्ट्रामधील आहेत. दरम्यान, पुण्यातील दोन जीवलग मित्र असलेल्या संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांची राज्यसभा खासदार शरद पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे.

पुण्यातील संतोष जगदाळे व कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव आज (दि.24) पहाटे शहरामध्ये आणण्यात आले. यावेळी पुणे विमानतळावर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी जगदाळे आणि गणबोटे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर जेष्ठ नेते व राज्यसभा खासदार शरद पवार हे देखील पुणे दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नींशी संवाद साधून तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दहशदवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीसोबत खासदार शरद पवार यांनी संवाद साधून घटनाक्रम जाणून घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, कौस्तुभ गणबोटेंचा मित्र कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. अजान पढता है क्या विचारलं? आम्ही हे ऐकल्यावर पटापटा टिकल्या काढून फेकल्या आणि अल्ला हो अकबर म्हणायला लागलो. जोरजोरात अल्‌लाचं नाव घेतले तेव्हा तो निघून गेला पण दोघांना (कौस्तुभगणबोटे आणि संतोष जगदाळे) यांना मारुन टाकलं. आणखी एकजण मागे बसला होता त्यालाही मारले” असा घटनाक्रम कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवारांना सांगितले.

शरद पवार यांनी देखील सोशल मीडिया पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. शऱद पवार यांनी लिहिले आहे की, कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी अंत झाला. आज या दोघांच्याही निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. जगदाळे व गणबोटे कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांच्याकडून हल्ल्याची सविस्तर माहिती जाणून घेतली.

पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या भ्याड अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी आणि पनवेलचे दिलीप देसले यांच्यासह अनेक निष्पाप भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्वांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.

कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी अंत झाला. आज या दोघांच्याही निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. जगदाळे व गणबोटे कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांच्याकडून हल्ल्याची सविस्तर माहिती जाणून… — Sharad Pawar (@PawarSpeaks) April 24, 2025

 

देशभरातील निष्पाप पर्यटक अशा भ्याड हल्ल्याचा बळी ठरावेत, ही बाब अंतःकरणाला चटका लावणारी आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. अशा अतिरेकी कृत्यांना छेद देणे आणि देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे, आजच्या काळाची गरज आहे, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Sharad pawar meet kaustubh ganbote and santosh jagdale family pahalgam attack news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • Jammu Kashmir Terror Attack
  • Pahalgam Terror Attack
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Mumbai Politics: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का; शहराध्यक्षा राखी जाधवांनी सोडली साथ
1

Mumbai Politics: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का; शहराध्यक्षा राखी जाधवांनी सोडली साथ

Pune Election 2026 NCP : ठरलं तर! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
2

Pune Election 2026 NCP : ठरलं तर! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना…; खासदार सुळेंकडून तोंडभरून कौतुक
3

गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना…; खासदार सुळेंकडून तोंडभरून कौतुक

Sanjay Raut News: ‘शरद पवारांचा पक्ष गौतम अदानींच्या भावाने फोडला…’; संजय राऊतांचा  गौप्यस्फोट
4

Sanjay Raut News: ‘शरद पवारांचा पक्ष गौतम अदानींच्या भावाने फोडला…’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.