Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यसभा खासदारकीवरुन महाविकास आघाडीमध्ये वादंग? शरद पवार की उद्धव ठाकरे कोणाला मिळणार संधी?

महाविकास आघाडीमधून जेष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवर जाणार की उद्धव ठाकरे यांना संधी दिली जाणार यावरुन चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीमध्ये एकच जागा राहिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 20, 2026 | 11:54 AM
Sharad Pawar go as Rajya Sabha MP or Uddhav Thackeray get a chance Rajyasabha Election 2026

Sharad Pawar go as Rajya Sabha MP or Uddhav Thackeray get a chance Rajyasabha Election 2026

Follow Us
Follow Us:
  • राज्यसभा खासदारकीवरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच
  • शरद पवार पुन्हा खासदार होणार का?
  • उद्धव ठाकरेंना राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता
Rajya Sabha MP : मुंबई : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रसह 10 राज्यांच्या राज्यसभा निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या सर्वात जास्त सात जागा रिक्त होणार आहेत. मात्र महाविकास आघाडीकडे केवळ 1 जागा राहणार आहे. संख्याबळामुळे महाविकास आघाडीमधून एकच खासदार राज्यसभेवर जाणार आहे. यामुळे आता रस्सीखेच सुरु झाली आहे. जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar)  हे पुन्हा राज्यसभेवर जाणार की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना संधी दिली जाणार यावरुन चर्चांना उधाण आले आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाणाऱ्या नेत्याबाबत देखील भूमिका मांडली आहे. यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यसभा खासदारकीबाबत वक्तव्य केले होते. त्यांनी रोटेशनचा मुद्दा पुढे करत यावेळी राज्यसभेवर शिवसेनेचा खासदार असेल असे विधान केले. तर त्यासाठी शिवसेनेकडे संख्याबळ असल्याचाही दावा केला. त्यामुळे राज्यसभेसाठी शरद पवार यांना सोडून उद्धधव ठाकरे पुढे येतील अशी चर्चा सुरु झाली. य़ाबाबत खासदार राऊत म्हणाले की, “आधी निर्णय तर होऊ द्या. महाविकास आघाडीची राज्यसभेसाठी एकच जागा आहे. तेवढे संख्याबळ आमच्याकडे आहे,” असे वक्तव्य खासदार राऊत यांनी केले.

हे देखील वाचा : राहुल गांधींसह २५ खासदारांना धमकी देणाऱ्या राज सिंह आमेराला कोटामधून अटक

पुढे ते म्हणाले की, “महाविकास आघाडीचे तीन पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी, अस्मितेसाठी नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व कोणतं आहे हे ठरवतील. अर्थात निर्णय एकमतानंच होणार आहे, आदित्य ठाकरे जे बोलले ते योग्य आहे. शरद पवार या देशाचे मोठे नेते आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते राज्यसभेतून निवृ्त्त होत आहेत. शरद पवार आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तीन पक्षांनाच मिळून निर्णय घ्यावा लागणार आहे, त्यामुळे त्याच्यावर आता बोलणे निरर्थक असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा : सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा; राजकीय हालचालींना वेग

उद्धव ठाकरे यांना राज्यसभेसाठी पाठवले जाणार का यावरुन चर्चांना उधाण आले आहे. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, “आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत, त्यामुळे आम्हाला प्रतिनिधीत्व मिळावं असं वाटणं हे सहाजिक आहे. तीन पक्ष एकत्र बसून एकमताने निर्णय घेऊ. महाराष्ट्र हिताचा निर्णय घेऊ. काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून होतो. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निर्णय मुंबईत होतो. जर राज्यसभेसाठी कोण कुर्बानी देणार त्याला विधान परिषदची जागा मिळणार, काँग्रेसची विधान परिषदेसाठी आमदार पाठवण्याची इच्छा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेवर जाणं थोडं कठीण आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

Web Title: Sharad pawar go as rajya sabha mp or uddhav thackeray get a chance rajyasabha election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Rajyasabha Election
  • Sharad Pawar
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
1

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.