Shinde group leader Jyoti Waghmare responded to Kunal Kamra's poem through poetry
मुंबई : राज्यामध्ये कुणाल कामरा याच्या कवितेमुळे राजकारण तापले आहे. कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदेंच्या राजकारणावर आणि बंडखोरीवर कविता सादर केली. या कवितेचा व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कुणाल कामरा याच्या स्टुडिओची देखील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणामध्ये ठाकरे गट हा कामराच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन कविता सादर केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या टीका करणारी विटंबना करणारी कविता कुणाल कामरा याने सादर केली होती. कुणालच्या कवितेला कवितेमधून उत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी अशाच पद्धतीचे गीत आणि संगीत असणारी कविता शेअर केली आहे. सोशल मीडियावर ज्योती वाघमारे यांनी कविता सादर केली आहे. यामध्ये त्यांनी खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ज्योती वाघमारे यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी जोरदार टीका करत उद्धव ठाकरेंच्या पक्षावर जहरी टीका केली आहे. ज्योती वाघमारे म्हणाले की, कुणाल कामरा सारख्या धुकरट कॉमेडियनला हाताशी धुरुन संजय राऊत आणि उबाठाने आपली लायकी दाखवून दिली आहे. आणि राऊत जर तुमच्याकडे पक्षाचे कार्यकर्ते उरलेच नसतील आणि असल्या वाचाळवीरांच्या जीवावर पक्ष चालवण्यापेक्षा, तुमच्या पक्षाचा गाशा गुंडाळ्या. आणि काळू-बाळूच्या तमाशासारखं संजय-उद्धवचा फड सुरु करा. आणि हातात तुणतुण घेऊन गावोगावाच्या जत्रा करा, अशा गंभीर शब्दांत ज्योती वाघमारे यांनी टीका केली आहे.
फालतू कॉमेडी करणाऱ्यांची चामडी लोळवेल
पुढे त्या म्हणाल्या की, कुणाल कामरा याने जर माफी मागितली नाही तर असल्या फालतू कॉमेडी करणाऱ्यांची चामडी कशी लोळवायची हे शिवसैनिकांना चांगलंच माहिती आहे, असा घणाघात ज्योती वाघमारे यांनी केला आहे. पुढे त्यांनी कुणाल कामरा याच्या कवितेच्या चालीप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका करत कविता म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्या म्हणाल्या की, भांडूप का भामटा…, सुबह की प्रेस…माईक देखतेही भोंके…हाय हाय.., बांद्रा का बंदर…हिंदूत्व को बेच कर…सीएम की खुर्सी को ललचाए…हाय हाय…, इन कमनोंको मिट्टी मे मिलाकर भगवा झेंडा फहराये…जनता की नजर से तुम देखों तो ठाणे का टायगर नजर आए…हाय हाय…चेंहरे पे दाढी…आखों मे शोले…तांडव करे जैसे शंभू भोले…उनकी दहाड सुनकर ये चुहे बिल मे जाके छुप जाए… जनता की नजर से तुम देखों तो ठाणे का टायगर नजर आए…, अशी कविता शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी कविता सादर केली आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.