Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Dombivli Politics: ठाकरे गटाच्या नेत्याच्या कार्यालयाचे शिंदेंच्या नगरसेवकाच्या हस्ते उद्घाटन,नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: या कार्यक्रमातील आपल्या उपस्थितीबद्दल शिंदे शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांना विचारण्यात आले असता त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आल्याचे सांगितले.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 25, 2026 | 09:43 AM
Kalyan Dombivli Thackeray vs Shinde faction news

Kalyan Dombivli Thackeray vs Shinde faction news

Follow Us
Close
Follow Us:
  •   ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन  शिंदे शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते
  • निलेश खंबायत आणि माझे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत- कुणाल पाटील
  • या कार्यक्रमात कोणतेही पक्षीय भेद किंवा राजकारण नाही- निलेश खंबायत
 

 

Kalyan Dombivli Politics: राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय शत्रुत्व आणि वाद हे काही लपून राहिलेले नाही. दोन्ही गटांमध्ये सातत्याने शाब्दिक चकमकी होत राहतात. मात्र, कल्याण-डोंबिवलीत मात्र काहीसा वेगळाच प्रकार समोर आला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही कट्टर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये एक वेगळेच मनोमिलन पाहायला मिळाले आहे. कल्याण पूर्व द्वारली येथे ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन चक्क शिंदे शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या अनोख्या उद्घाटनामुळे सध्या स्थानिक राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Nashik Crime: नाशिकमध्ये जमीन वादातून थरार! दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा आरोप

फक्त मैत्रीखातर आलो: कुणाल पाटील

या कार्यक्रमातील आपल्या उपस्थितीबद्दल शिंदे शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांना विचारण्यात आले असता त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आल्याचे सांगितले. कुणाल पाटील म्हणाले की, “मला या कार्यक्रमाचे अधिकृत आमंत्रण देण्यात आले होते, म्हणूनच मी येथे आलो. निलेश खंबायत आणि माझे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत.”

पक्षाचे कोणतेही भेद नाहीत: निलेश खंबायत

तर “या कार्यक्रमात कोणतेही पक्षीय भेद किंवा राजकारण नाही. आमचे गटनेते सध्या पुण्याला आहेत. दुसरीकडे, कुणाल पाटील यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध आहेत. एक मोठा भाऊ या नात्याने मी त्यांना या उद्घाटनासाठी बोलावले होते, त्यामुळे यातून दुसरा कोणताही राजकीय अर्थ काढू नये,” असे ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांनी स्पष्ट केले.

NEET UG 2026 Paper Leak: पुण्याच्या मुख्याध्यापिकेने उघड केले ‘एनटीए’ कनेक्शन; आता रसायनशास्त्र तज्ञही सीबीआयच्या

निलेश खंबायत यांनी सांगितले की, “आमच्या गटाचे नेते उमेश बोरगावकर हे सध्या पुण्यात आहेत. तसेच इतर नेते संध्याकाळी दुसऱ्या एका नगरसेवकाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जाणार असल्याने आज दुपारी माझ्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. माझे आणि कुणाल पाटील यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यामध्ये कोणतेही राजकारण नाही.”

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नागरिकांच्या हितासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांना निधी किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास मी आणि माझे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ती मदत केली जाईल. यात कोणतेही राजकारण नाही.”

Web Title: Shinde senas kunal patil attends thackeray senas nilesh khambayats event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 09:43 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.