Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat : नीलम गोऱ्हे सुद्धा अशोक खरातच्या भक्त? राजकीय फायद्यासाठी केली नाशिकवारी

Ashok Kharat News : शिंदेसेनेच्या नेत्या आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यादेखील खरातच्या भक्त असल्याचा खळबळजनक दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 30, 2026 | 12:21 PM
ShivSena leader Neelam Gorhe follow and meet Ashok Kharat Trupti Desai claim

ShivSena leader Neelam Gorhe follow and meet Ashok Kharat Trupti Desai claim

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरातचे राजकीय कनेक्शन समोर
  • नीलम गोऱ्हे सुद्धा अशोक खरातच्या भक्त?
  • तृप्ती देसाई यांचा दावा
Ashok Kharat Marathi News : नाशिक : सध्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोकने (Ashok Kharat) शेकडो महिलांवर अत्याचार केले आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली गुन्हेगारी केली असून मोठे रॅकेट समोर आले आहे. अशोक खरातचे राजकीय कनेक्शन देखील समोर आले आहे. रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यासारखी अनेक नावे समोर आली आहेत. यानंतर आता शिंदेसेनेच्या नेत्या आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यादेखील खरातच्या भक्त असल्याचा खळबळजनक दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तृप्ती देसाई म्हणाल्या की, नीलम गोऱ्हे गेली पाच ते सहा वर्ष या भोंदूबाबा अशोक खरातकडे जात होत्या. त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती. इतर वेळेस नीलम गोऱ्हे अनेक गोष्टींवर बोलतात. आता अशोक खरातवर का बोलत नाहीत? कारण त्यांचे खरातशी संबंध आहेत. त्या खरातकडे जात होत्या. नाशिकच्या कॉलेज रोड येथील अशोक खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोऱ्हे जात होत्या, असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.

हे देखील वाचा : काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा भीषण अपघात; एअरबॅग उघडल्या नाहीच अन्..

पुढे त्या म्हणाल्या की,” हा भोंदूबाबा पाथर्डी येथील हॉटेलमध्ये देखील भेटायला आला होता. तो तिथं तुम्हाला भेटण्यास का आला होता? तुमच्यात आणि त्याच्यात काही आर्थिक व्यवहार आहेत का? की आणखीन काही आहे? या सगळ्या गोष्टी समोर यायला हव्या. 39 आमदारांमध्ये नीलम गोऱ्हे या देखील अशोक खरातला भेटायला जात होत्या. नाशिकमधील एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये ते भेटले. आमदारकी आणि मंत्रीपदासाठी अनेक वेळा त्या अशोक खरातला भेटल्या होत्या. नीलम गोऱ्हे या भविष्य पाहण्यासाठी जात होत्या,” असा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.

हे देखील वाचा : “राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?

पुढे तृप्ती देसाई म्हणाल्या की, “ज्या ऑफिसमध्ये अनेक महिलांवर अत्याचार झाला, त्याच ऑफिसला नीलम गोऱ्हे अशोक खरातला भेटल्या होत्या. नीलम गोऱ्हे यांची देखील चौकशी व्हायला हवी. नीलम गोऱ्हे या गेल्या सात ते आठ वर्षांपासून अशोक खरातला ओळखत होत्या. कोरोना काळाच्या आधी एका हॉटेलमध्ये नीलम गोऱ्हे यांना भेटण्यासाठी अशोक खरात आला होता,” असे मत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Shivsena leader neelam gorhe follow and meet ashok kharat trupti desai claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Nashik Crime
  • Neelam Gorhe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.