shivsena leader uddhav thackeray press conference in delhi political news
Uddhav Thackeray Delhi Press : नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. माहाराष्ट्रामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेला दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो आहे. उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांच्यासोबत देखील बैठक पार पडली आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांचा इंडिया आघाडीसोबत देखील स्नेहभोजनचा कार्यक्रम आहे. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
दिल्लीमधून पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन तीन वर्षापूर्वी शेतकरी दिल्लीत येत होते. त्यांना रोखलं होतं. सहा महिने तळ ठोकून होते. काही शेतकरी मेले. तेव्हा शेतकऱ्यांची आठवण आली नाही. तेव्हा तर म्हणायचे शेतकऱ्यांची मुलं आहोत म्हणायचे. तेव्हा या शेतकऱ्यांसाठी का पुढे आला नाही. किल डाल दी, दिवारे खडी की, नक्षलवादी म्हटलं तेव्हा शेतकरी आठवले नाही का. त्यांचा चेहरा उघड झाला, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आम्ही दोघं भाऊ सक्षम आहोत
उद्धव ठाकरे यांना खासदार राहुल गांधी यांनी निमंत्रण दिले असून उद्धव ठाकरे यांचे इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत स्नेहभोजन आहे. यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तब्बल 2 दशकांनंतर एकत्र आले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत युती करणार का याची उत्सुकता लागली आहे. याबाबत ते म्हणाले की, इंडिया आघाडीत अटतटी नाही. राज आणि आम्ही निर्णय घेण्यात सक्षम आहोत. आम्ही दोघं भाऊ सक्षम आहोत. जे करायचं ते करु. त्यात तिसऱ्याची गरज नाही, असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सच्चा देशभक्ताने पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवू नये
उद्धव ठाकरे यांनी भारत आणि पाकिस्तान संबंधावर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, सरकारला नीतीमत्ता राहिली नाही. पाकिस्तान दुश्मन आहे. दिल्लीत आम्ही मॅच रोखली होती. मुंबईत रोखली होती. जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत मॅच खेळू नये हे आम्ही सांगोयचो. सुषमा स्वराज यांनीही म्हटलं होतं. हे मतलबी लोक आहे. आपल्याला धडे देतात. पण जय शहासकट मंत्र्यांची मुलं दुबईत जाऊन पाकिस्तानची मॅच पाहत आहेत. हे देशभक्त असूच शकत नाही. देशभक्तीची व्याख्या करायची असेल तर सच्चा देशभक्ताने पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवू नये, असे वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.