Shivsena mp Sanjay Raut vs bjp mp Narayan Rane defamation case update
Rane Vs Raut : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या टीकेचे प्रमाण वाढले आहे. राजकीय नेते एकमेकांवर वैयक्तिक वक्तव्य करत आरोप करत आहेत. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांमध्ये अनेक नेते आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर मानहानीचा आरोप करत खटला दाखल केला. या प्रकरणाची आता न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली असून नारायण राणे यांनी आरोप फेटाळले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभा खासदार नारायण राणे हे अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येतात. 2023 मध्ये त्यांनी नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. मात्र ही टीका खासदार संजय राऊतांच्या जिव्हारी लागली. संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर मानहानीचा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात यांनी सोमवारी मुंबई न्यायालयासमोर नारायण राणे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी नारायण राणे यांनी मला आरोप मान्य नाहीत मी निर्दोष आहे, असे न्यायायलामध्ये सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
15 जानेवारी 2023 रोजी भांडुप येथे झालेल्या कोकण महोत्सवादरम्यान खासदार नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरुन खासदार राऊत यांनी माजी केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध “बदनामीकारक, दुर्भावनापूर्ण आणि खोटी विधाने” केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. मात्र आता कोर्टामध्ये भाजप खासदार नारायण राणे यांनी निर्दोष असल्याचे कबूल केल्यानंतर, ११ नोव्हेंबरपासून मॅजिस्ट्रेट कोर्टात साक्षीदारांच्या जबाबाने या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे.
नारायण राणे काय म्हणाले?
भारतीय जनता पक्षाच्या नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव मतदार यादीत नसल्याचे आणि ते (राणे) अविभाजित शिवसेनेत असताना त्यांनी संजय राऊत यांना राज्यसभेवर निवडून येण्यास मदत केली होती असे म्हटले होते. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० (बदनामी) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ज्येष्ठ भाजप नेते नारायण राणे सोमवारी त्यांच्या वकिलासह न्यायिक दंडाधिकारी (माझगाव न्यायालय) ए.ए. कुलकर्णी यांच्यासमोर हजर झाले आणि त्यांनी निर्दोष असल्याचे सांगितले. यापूर्वी, दंडाधिकारी न्यायालयाने एप्रिलमध्ये तक्रारीची दखल घेतली होती आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील भाजप खासदार असलेल्या नारायण राणे यांना समन्स बजावले होते. नारायण राणे यांनी समन्सला विशेष खासदार/आमदार न्यायालयात आव्हान दिले होते आणि म्हटले होते की त्यांच्याविरुद्ध कोणताही मानहानीचा खटला दाखल झालेला नाही.