Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrirang Barne affidavit News : खासदार श्रीरंग बारणे हाजीर हो….! शपथपत्रात दिली खोटी माहिती दिल्या प्रकरणी न्यायालयाचा दणका

Shrirang Barne affidavit News : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी वडगाव मावळ विशेष न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 19, 2025 | 05:21 PM
Shivsena mp Shrirang Barane false information in affidavit in vadgaon maval court

Shivsena mp Shrirang Barane false information in affidavit in vadgaon maval court

Follow Us
Close
Follow Us:

Shrirang Barne affidavit News :  वडगाव मावळ : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना वडगाव मावळ विशेष न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता 22 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणुकांच्या वेळी त्यांच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार अनिल भांगरे आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी न्यायालयाकडे केली होती. खासदार श्रीरंग बारणे यांनी २००९ आणि २०१९ च्या निवडणुकांदरम्यान नामनिर्देशन पत्रासोबत दिलेल्या शपथपत्रात जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता. खासदार श्रीरंग बारणे यांनी शैक्षणिक पातळीविषयी माहिती चुकीची दिली असल्याचा आरोप केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी शपथपत्रात खासदार श्रीरंग बारणे यांनी शैक्षणिक पात्रता ‘दहावी नापास’ अशी नमूद केली होती, तर २००९ मध्ये त्यांनी ‘दहावी उत्तीर्ण, सन १९८९’ असे लिहिले होते. याशिवाय, त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात पिंपरी न्यायालयातील एक प्रकरण आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा समावेश आहे.

न्यायालयाने शपथपत्रांमधील शैक्षणिक पात्रतेतील विसंगती आणि प्रलंबित प्रकरणांविषयी दिलेली अपुरी माहिती लक्षात घेतली. न्यायालयान याबाबत वडगाव मावळ पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पोलिसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानंतर डॉ. हरिदास यांनी युक्तिवाद केला. या निष्कर्षांच्या आधारे न्यायालयाने बारणे यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम १२५-अ अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यास पुरेशी कारणे असल्याचे नमूद केले असून त्याविरोधात प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

टायगर पॉईंट पर्यटन प्रकल्पाला गती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात लोणावळा येथील कुरवंडे गावात प्रस्तावित टायगर पॉईंट प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रकल्पासाठी ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच ३३३ कोटी रुपयांची मान्यता मिळाली असून, पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मावळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. बैठकीत या प्रकल्पात प्रवेशद्वार, टिकीट घर, फूड कोर्ट, स्नॅक बार, वाहनतळ, कनिष्ठ समारंभ हॉल अशा सुविधा उभारल्या जाणार आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सायटसीईंग, झिप लाईन, बंजी जंपिंग, वॉल क्लायम्बिंग, फेरीस व्हील अशा साहसी खेळांचा समावेश करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे मनोरंजन व सुरक्षतेच्या दृष्टीने झुला, रेन डान्स, स्केटिंग रिंक, पाण्याची टाकी, सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना यांचा प्रकल्पात समावेश असून, उन्हाळ्यातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेवर विशेष भर दिला जाणार आहे.

Web Title: Shivsena mp shrirang barane false information in affidavit in vadgaon maval court political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • maval news
  • political news
  • Shrirang Barne

संबंधित बातम्या

Satara News : जिल्हा परिषदेत कमळ फुललं; सातारा झेडपीवर भाजपचा झेंडा फडकला
1

Satara News : जिल्हा परिषदेत कमळ फुललं; सातारा झेडपीवर भाजपचा झेंडा फडकला

‘सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अधिकार भाजपचाच होता, पण…’; मंत्री गोरेंचं मोठं विधान
2

‘सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अधिकार भाजपचाच होता, पण…’; मंत्री गोरेंचं मोठं विधान

Sangali News : झेडपीत मविआचा ‘करेक्ट कार्यक्रम’; भाजपला झटका; गुढीपाडव्यादिवशी सत्तेची गुढी
3

Sangali News : झेडपीत मविआचा ‘करेक्ट कार्यक्रम’; भाजपला झटका; गुढीपाडव्यादिवशी सत्तेची गुढी

Pune News : 40 गट एकत्र आले तर महाराष्ट्रात सत्ता बहुजनांचीच येईल; उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा विश्वास
4

Pune News : 40 गट एकत्र आले तर महाराष्ट्रात सत्ता बहुजनांचीच येईल; उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.